Collagen : त्वचा, स्नायू, हाडांसाठी महत्त्वाचा घटक, कमतरतेमुळे बिघडू शकतं शरीराचं संतुलन
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कोलेजन या प्रथिनामुळे त्वचा, हाडं, सांधे, स्नायू आणि इतर अवयवांना ताकद आणि लवचिकता मिळते. अनेकदा चुकीच्या सवयींमुळे कोलेजनचं उत्पादन कमी होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेजन पातळी वाढवण्यासाठी वाईट सवयी सोडून द्याव्या लागतील.
मुंबई : त्वचा कोरडी पडणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं असे बदल होत असतील तर कोलेजनची कमतरता हे एक कारण असू शकतं. कोलेजन हे शरीरातील तंतुमय प्रथिन. याचं महत्त्व म्हणजे यामुळे त्वचा, हाडं, सांधे, स्नायू आणि इतर अवयवांना ताकद आणि लवचिकता मिळते. यामुळे कूर्चाचं संतुलन राखता येतं. शरीरासाठी आवश्यक असलेलं हे जीवनसत्व शरीराच्या अनेक भागांमध्ये आढळते.
अनेकदा चुकीच्या सवयींमुळे कोलेजनचं उत्पादन कमी होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेजन पातळी वाढवण्यासाठी वाईट सवयी सोडून द्याव्या लागतील.
advertisement
कोलेजन कशामुळे कमी होतं ?
सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याऐवजी चहा किंवा कॉफीचं सेवन करतात, त्याऐवजी दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यानं करावी. पाणी प्यायल्यानं त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण होतात आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी मदत होते, यामुळे कोलेजनचं उत्पादन सुधारतं.
न्याहारी न करण्याची सवय कोलेजन उत्पादनात अडथळा आणू शकते. न्याहारी हा दिवसातला पहिला आहार असतो. न्याहारी टाळली तर शरीराला व्हिटॅमिन सी, प्रथिनं आणि अँटिऑक्सिडंट्स मिळत नाहीत, हे सर्व घटक कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असतात.
advertisement
बराच वेळ उपवास केला किंवा वेळेत नाश्ता केला नाही तर शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे कोलेजनचं नुकसान होऊ शकतं.
शरीरात कोलेजन वाढवण्यासाठी हे नक्की करा -
कोलेजनचं उत्पादन वाढवण्यासाठी, व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचं सेवन वाढवा.
advertisement
आहारात संत्री, केळी, किवी, द्राक्षं, पेरू, पपई खाण्यास सुरुवात करा. व्हिटॅमिन सी त्वचेचं संरक्षण करण्यासाठी मदत करते आणि यामुळे कोलेजनही वाढतं.
कोरफडीच्या रसामुळे, कोलेजनचं उत्पादन वाढतं. कोरफड चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेवरची चमक कायम राहते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
कोथिंबीरीमुळे शरीरातील कोलेजनचं उत्पादन वाढू शकतं. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लिनोलेनिक आढळतात, यामुळे तुमच्या शरीरात कोलेजनचं उत्पादन वाढवण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 03, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Collagen : त्वचा, स्नायू, हाडांसाठी महत्त्वाचा घटक, कमतरतेमुळे बिघडू शकतं शरीराचं संतुलन