Beauty Tips : चेहऱ्याच्या सैल झालेल्या त्वचेवर प्रभावी उपाय, मसाज, फेस मास्कची होईल मदत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सैल झालेली त्वचा घट्ट करण्यासाठी, मसाज, मास्कचा उपयोग होतो. तसंच केळी, कोरफडीचा मास्कही उपयुक्त ठरतो. पुरेसं पाणी पिणं ही त्वचेसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे.
मुंबई : काही कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा सैल होते. ती पूर्णपणे पूर्ववत करणं शक्य नसलं तरी, ही त्वचा घट्ट करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत. चमकणारी, डाग नसलेली त्वचा प्रत्येकाला आवडते. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात भर पडते. चेहऱ्यावरची चमक कमी झाली तर तुम्हाला ताण जाणवू शकतो. काही सोपे उपाय केल्यानं तुमच्या चेहरा फ्रेश दिसेल.
झोपण्यापूर्वी चेहऱ्याला करा तेलानं मसाज
सर्वात आधी, चेहरा स्वच्छ आणि कोरडी करा. आता हातात पुरेसं तेल घ्या. त्यानंतर चेहऱ्याला हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर रात्रभर चेहऱ्यावर तेल लावून ठेवा आणि सकाळी कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा.
advertisement
केळी
सर्व प्रथम, एका भांड्यात एक चतुर्थांश केळं चांगलं कुस्करा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटं सोडा. यानंतर, आपला चेहरा कोमट पाण्यानं धुवा आणि कोरडं करा.
काकडीचा फेस मास्क
काकडी सोलून त्याचा रस काढा, नंतर कापसाच्या मदतीनं संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटं राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि घट्ट राहण्यास मदत होईल.
advertisement
कोरफड
कोरफड जेलनं चेहऱ्याला पूर्ण मसाज करा. 15-20 मिनिटं जेल चेहऱ्यावर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या त्वचेचा घट्टपणा टिकून राहण्यासाठी मदत होईल.
हायड्रेशन
हायड्रेशन म्हणजेच पुरेसं पाणी पिणं. यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत होते. पुरेसं पाणी प्यायल्यानं चेहऱ्याची सैल त्वचा घट्ट होते आणि ग्लोही कायम राहतो.
advertisement
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी हे एक पोषक तत्व आहे, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी असलेला आहार घेतल्यानं चेहऱ्याची सैल त्वचा घट्ट होण्यास मदत होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 28, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Beauty Tips : चेहऱ्याच्या सैल झालेल्या त्वचेवर प्रभावी उपाय, मसाज, फेस मास्कची होईल मदत