Mumbai-Pune Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवे होणार हाय-टेक! आता प्रवास अधिक वेगवान; काय आहे 14 हजार कोटीचा 'मास्टरप्लॅन'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्सप्रेसवेच्या विस्तारीकरणाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत आता या द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे उभारले जाणार आहेत.
पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाढती वाहतूक कोंडी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्सप्रेसवेच्या विस्तारीकरणाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत आता या द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे उभारले जाणार आहेत. ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून मार्ग अधिक सुसह्य होणार आहे.
१४,५०० कोटींचा भव्य प्रकल्प
या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात याला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १४,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 'बांधा, वापरा व हस्तांतर' (BOT) तत्त्वावर राबविला जाणार आहे. विस्तारीकरणानंतर एक्सप्रेसवेवर दोन्ही बाजूंनी दोन अतिरिक्त मार्गिका (Lanes) वाढणार आहेत, ज्यामुळे दिवसाला दीड लाख वाहने सहज प्रवास करू शकतील.
advertisement
प्रकल्पासाठी १०४ हेक्टर जागेची आवश्यकता असून, भूसंपादनाची प्रक्रिया मंजुरीनंतर तातडीने सुरू होईल.
कुठे होणार हे ६ नवीन बोगदे?
खंडाळा: १ बोगदा
कामशेत: २ बोगदे
भाटण: १ बोगदा
आडोशी: १ बोगदा
माडप: १ बोगदा
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे घाटवळणावर होणारी वाहतूक कोंडी कायमची सुटण्यास मदत होईल. बोगद्यांच्या निर्मितीमुळे एक्सप्रेसवे अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार असून, मुंबई-पुणे प्रवास अधिक सुखकर होईल. तसंच या मार्गावरील वाहतूक कोंडीचा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रश्नही मार्गी लागेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 11:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवे होणार हाय-टेक! आता प्रवास अधिक वेगवान; काय आहे 14 हजार कोटीचा 'मास्टरप्लॅन'









