भारताला 'मसाल्यांचा देश' म्हटलं जातं. हे मसाले आपल्या स्वयंपाकघराची शान आणि अभिमान आहेत. भारतभरात म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत या मसाल्यांचा दरवळ अरतो. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (ISO) च्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या 109 पैकी सुमारे 75 फक्त भारतात उत्पादित होतात.
Health Tips: वेळेत जेवण करा, प्रकृती राहील ठणठणीत, आरोग्यासाठी फायदेशीर टिप्स
advertisement
आपल्या नंतर तुर्की आणि नंतर बांगलादेश येतो. मसाले केवळ चव आणि सुगंध वाढवत नाहीत तर ते आरोग्यासाठी वरदान देखील आहेत. हे मसाले आरोग्यासाठीही कसे वरदान आहेत पाहूया.
जायफळ-
जायफळ उत्तम चवीबरोबरच आरोग्यासाठीही उत्तम आहे. जायफळाच्या सेवनानं झोपेच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि मानसिक शांती मिळते. यामुळे पचन तंत्र मजबूत होतं आणि गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.
दालचिनी-
दालचिनीचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही तर त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. हृदयाच्या आरोग्यास देखील दालचिनी फायदेशीर ठरते. दालचिनीमुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
Tanning: टॅनिंग कमी करण्यासाठी करा हा उपाय, घरी करा मेनिक्युअर आणि पेडिक्युअर
काळी मिरी
काळी मिरी म्हणजे "मसाल्यांची राणी". हा मसाला स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. काळी मिरी अनेक पदार्थांमध्ये मसाला म्हणून वापरली जाते. तसंच, आयुर्वेदिक औषध म्हणूनही याचा वापर होतो. काळी मिरी पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. तसंच काळ्या मिरीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. दात दुखत असतील तर काळी मिरी खाल्ल्यानं वेदना कमी होते. तसंच हृदय निरोगी ठेवण्यासही यामुळे मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते.
4. लवंग-
चहा आणि जेवणासह अनेक गोष्टींमध्ये वापरला जाणारा मसाला म्हणजे लवंग...लवंगेत जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. लवंग नियमित खाल्ल्यानं तुमचं विषाणूपासून संरक्षण होईल. हा मसाला तोंडाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लवंगमुळे दातदुखी कमी होते याशिवाय लवंगेमुळे पचनक्रिया सुधारते.
5. जिरं-
भारतीय जेवणात जिऱ्याचा वापर हमखास आणि रोज केला जातो. जिऱ्याची चव आणि सुगंध प्रत्येक घरात दरवळतो. तज्ज्ञांच्या मते, जिरं चवीबरोबरच शरीरासाठीही फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारतं आणि गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.