Tanning: टॅनिंग कमी करण्यासाठी करा हा उपाय, घरी करा मेनिक्युअर आणि पेडिक्युअर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहऱ्याची काळजी घेता, तशीच तुमच्या हात आणि पायांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. हात आणि पाय खूप टॅन झाले असतील तर तुम्ही घरी पेडीक्युअर आणि मॅनिक्युअर करु शकता.
मुंबई : चेहऱ्याची काळजी घेता, तशीच तुमच्या हात आणि पायांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. हात आणि पाय खूप टॅन झाले असतील तर तुम्ही घरी पेडीक्युअर आणि मॅनिक्युअर करु शकता. घरीच पाय आणि हातांच्या स्वच्छतेसाठीचे घरगुती उपाय पाहूया.
लिंबू आणि साखर
लिंबाच्या रसात साखर मिसळून हात पाय स्वच्छ करू शकता. यामुळे टॅनिंग कमी होईल आणि त्वचा चमकदार होईल. तसंच दह्यात हळद मिसळून हात आणि पायांची टॅनिंग कमी करता येतं. यामुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळतं ज्यामुळे ती चमकदार दिसते.
advertisement
बेसन आणि दूध
बेसन आणि दुधाच्या मिश्रणानंही हात आणि पायांचं टॅनिंग कमी होईल. यामुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळेल आणि त्वचाही स्वच्छ आणि चमकदार दिसेल.
घरी पेडीक्युअर कसं करावं ?
सर्वप्रथम गरम पाण्यात पाय भिजवा. त्यात भिजवून स्वच्छ करा. आता तुमच्या पायाची आणि हातांची नखं कापून फाइल करा. पाय चांगले घासून घ्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. यानंतर, पायांना मॉइश्चरायझर लावा आणि नंतर थोडा वेळ झाकून ठेवा.
advertisement
घरी मेनिक्युअर कसं करावं ?
सर्व प्रथम, आपले हात काही वेळ गरम पाण्यात भिजवा, नंतर नखं व्यवस्थित फाइल करा. आता आपले हात चांगले मॉइश्चराइज करा, नंतर थोडा वेळ झाकून ठेवा. या पद्धतींद्वारे तुम्ही तुमचे हात आणि पाय व्यवस्थित स्वच्छ करू शकता.
मेनिक्युअर आणि पेडिक्युअरसाठी लिंबू, साखर, बेसन पीठ आणि दुधाचा उपयोग नक्की करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2025 5:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tanning: टॅनिंग कमी करण्यासाठी करा हा उपाय, घरी करा मेनिक्युअर आणि पेडिक्युअर