घाऊक दरात मिळणाऱ्या भाज्या आणि फळं नक्की खा. त्यातलंच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेलं फळं म्हणजे संत्र...कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन कॅलरीजचं सेवन कमी करण्यासाठी संत्री अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. आजकाल, बहुतेकांना पोटाची चरबी वाढण्याची चिंता असते आणि प्रत्येकाला बारीक व्हावंसं वाटतं.
बारीक व्हायचं असेल तर पोटाची चरबी कमी करणं सोपं नाही. यासाठी कठोर परिश्रम आणि जीवनशैलीतला बदल गरजेचा आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि तणाव या कारणांमुळे पोटाची चरबी वाढते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात, परंतु जर तुम्हाला नैसर्गिक आणि प्रभावी पद्धतीनं पोटाची चरबी कमी करायची असेल तर काही खास फळं या कामात खूप प्रभावी ठरू शकतात.
advertisement
Black Pepper, Ghee : तुपासोबत खा काळी मिरी पूड, रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्वचा - केसांसाठीही उपयुक्त
व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत असलेली संत्री पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतात. यामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे हे शक्य होतं. संत्र्यांमध्ये कमी कॅलरी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात त्याचा समावेश केला जाऊ शकतो.
फायबर (तंतूमयता): संत्र्यांमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे कॅलरीजचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
व्हिटॅमिन सीचा स्त्रोत : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे चयापचय गतिमान होण्यास मदत होते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते.
Raisins : मनुका जास्त खाऊ नका, फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या
पाण्याचं प्रमाण : संत्र्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे शरीराला आवश्यक आर्द्रता मिळते. यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्या पोटात कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
संत्र्याचं नियमित सेवन केल्यानं चयापचय क्रिया वेगवान होण्यास मदत होते. तुमच्या आहारात संत्र्यांचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.
संत्र्याचं सेवन केल्यानं शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
संत्र्याचा रस : संत्र सोलून खाण्याव्यतिरिक्त संत्र्याचा ताजा रस बनवून तो सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचा खूप फायदा होतो. यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जाही मिळेल.
संत्र्याची स्मूदी : तुम्ही इतर फळांमध्ये संत्र मिसळून स्मूदी बनवू शकता. चव छान असेलच पण वजन कमी होण्यासही मदत होईल.