ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता.
तुरटी चेहऱ्यावर रात्रभर लावल्यानं त्वचेवर काय परिणाम होतात याविषयीची माहिती.
तुरटी या सौंदर्य उत्पादनाचा सर्वाधिक वापर दाढी करताना केला जातो. अनेकदा शेव्हिंग केल्यानंतर त्वचेवर जळजळ होते किंवा त्वचा कापली जाते, तेव्हा तुरटीचा वापर केल्यानं थंडावा मिळतो. तुरटीमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.
advertisement
तुरटी चेहऱ्यावर रात्रभर लावून झोपण्याचे फायदे
- रात्रभर चेहऱ्यावर तुरटी लावून झोपल्यास, तुमच्या त्वचेवरील मुरुम आणि मुरुमांमुळे होणारे सर्व डाग कमी होण्यास मदत होते.
Potato Peels : बटाट्याच्या सालाचे फायदे ऐकून व्हाल थक्क, त्वचा, केसांसाठी उपयुक्त, असा करा वापर
त्याच वेळी, जर तुमच्या त्वचेवर मुरुम झाले असतील तर त्यातही तुरटीचा वापर उपयुक्त ठरतो. ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी याचा उपयोग होतो.
Vitamin Deficiency : दातांच्या आरोग्याकडे द्या लक्ष, कमकुवत दातांमागे असू शकतं हे कारण
याशिवाय तुरटी ब्लॅक अँड व्हाईट हेड्स काढण्यासाठीही खूप उपयुक्त ठरते.
तुरटी लावल्यानं टॅनिंगच्या समस्येपासून सुटका मिळू शकते आणि सुरकुत्यांसारखी त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणंही कमी करता येतात.
तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर ती कमी करण्यासाठीही तुरटीचा वापर होतो.
तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल, तर हा उपाय वापरण्यापूर्वी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा पॅच टेस्ट करून घ्या.