आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्व अवयव महत्त्वाचे आहेतच. त्यातलाच किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचं महत्त्वाचं काम किडनी करते. किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कलिंगड हे फळ रामबाण उपाय आहे.
Fat Loss : पोटावरची चरबी होईल कमी, हे पेय नक्की पिऊन बघा, पोट जाईल आत
advertisement
उन्हाळ्यात येणारं कलिंगड हे फळ चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. कलिंगडाचा रस पिणं किडनी निरोगी राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. रक्तातील खनिजं, क्षार, पाण्याचं संतुलन राखणं कलिंगडातील घटकांमुळे शक्य होतं. शरीर आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणं गरजेचं आहे.
किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त कलिंगडाचा रस:
कलिंगड हे उन्हाळ्यातील फळ. त्यात नव्वद टक्के पाणी असतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियमसारखे गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता.
Amla Tea : आरोग्यदायी आवळा, आवळा चहा प्या, निरोगी रहा
1. मूत्रपिंड-
किडनीच्या रुग्णांसाठी कलिंगडाचा रस खूप फायदेशीर मानला जातो. हा रस प्यायल्यामुळे किडनी दुखणं आणि सूज यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
2. डिहायड्रेशन-
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी कलिंगड खा किंवा कलिंगडाचा रस प्या.
3. त्वचा-
कलिंगडाचा रस प्यायल्यानं त्वचा दीर्घकाळ तजेलदार दिसते. यामुळे वयाचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते.