बदाम - अक्रोड यासारखा सुका मेवा मेंदूला तीक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण आपल्या दिनचर्येत, स्मरणशक्ती वाढण्यासाठी कमीत कमी पाच मिनिटं ध्यान करण्यासाठी द्या, यामुळे तुम्ही दिवसभर सतर्क आणि उत्साही राहता.
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी ध्यान करण्याचे फायदे
1. ध्यान: मानसिक शांतीसाठी उपयुक्त
सकाळी उठल्यानंतर शांत ठिकाणी बसून पाच मिनिटं ध्यानाला बसा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. यावेळी, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि इतर विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यानामुळे मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि मेंदूतील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक सतर्कता सुधारण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
advertisement
Constipation : पोट स्वच्छ ठेवण्यासाठीचा सोपा उपाय, झोपण्यापूर्वी घ्या हे औषध
2. मेंदूचा व्यायाम: मेंदूचा वापर होईल यादृष्टीनं काम करा. दिवसातला काही वेळ मेंदूच्या मशागतीसाठी द्या. कोडी सोडवणं, आकडेमोड करणं किंवा शब्दांचे खेळ - क्रॉसवर्ड, सुडोकू सोडवण्यावर भर द्या. या व्यायामामुळे मेंदू सक्रिय राहतो, यामुळे न्यूरॉन कनेक्शन मजबूत होतं आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
मेंदूला तीक्ष्ण बनवण्यासाठी या टिप्सचा उपयोग होईल -
1. खोल श्वास घेणं
सकाळी 5 मिनिटं दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. दीर्घ श्वासोच्छवासामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
2. स्ट्रेचिंग आणि योगा
सूर्यनमस्कार किंवा ताडासन, वज्रासन यासारख्या साध्या योगासनांनी सकाळची सुरुवात करा. योगासनामुळे मेंदू आणि शरीरात चांगला समन्वय निर्माण होतो आणि मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते.
सकाळच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा -
भिजवलेले बदाम आणि अक्रोड: मेंदूला चालना देण्यासाठी प्रथिनं आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् समृध्द असतात. त्यामुळे भिजवलेले बदाम आणि अक्रोड हे पोषक खाद्य आहे.
Summer Skin Care : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची विशेष काळजी, फेस पॅकमुळे चेहरा राहिल फ्रेश
अश्वगंधा किंवा ब्राह्मी पावडर: एक ग्लास कोमट दुधात ही पावडर मिसळून प्या, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी याची मदत होते.
मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी आणखी टिप्स
पुरेशी झोप : मेंदूसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. यासाठी 7-8 तासांची झोप घ्या.
स्क्रीन टाइम कमी करा: मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या अतिवापरानं मेंदूचा थकवा वाढतो.
पुरेसं पाणी प्या: शरीर सक्रिय राहण्यासाठी पुरेसं पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे.