Constipation : पोट स्वच्छ ठेवण्यासाठीचा सोपा उपाय, झोपण्यापूर्वी घ्या हे औषध

Last Updated:

पोट नीट साफ होत नसेल तर झोपण्यापूर्वी दुधात त्रिफळा चूर्ण किंवा तूप-मध मिसळून प्यायल्यानं ही समस्या दूर होऊ शकते. या नैसर्गिक उपायामुळे तुमची पचनसंस्था सुधारते.

News18
News18
मुंबई : अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या सर्व वयोगटांमध्ये आढळतात. खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि तणावामुळे अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. वेळेवर न जेवणं, न झोपणं या सर्व सवयींचा परिणाम सर्वात आधी आपल्या पोटावर होतो.
पोट स्वच्छ नसल्यामुळे अनेकांना त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे पोटात गॅस तयार होतो आणि त्यामुळे आपल्या भूकेवरही परिणाम होतो. पोट साफ नसल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे आरोग्याच्या इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. बद्धकोष्ठतेमुळे तुम्हीही त्रासला असाल तर घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
बद्धकोष्ठता होण्याची कारणं
फायबरचा अभाव म्हणजेच तंतुमयता नसलेले पदार्थ खाणं
advertisement
पुरेसं पाणी न पिणं
शारीरिक हालचालींचा अभाव
जंक फूड किंवा तळलेलं अन्न जास्त प्रमाणात खाणं.
जेवणाच्या अनियमित वेळा आणि ताण
बद्धकोष्ठता आणि पोट स्वच्छ ठेवण्यासाठीचे उपाय
1. तूप आणि मध
तूप आणि मध यांचं मिश्रण पोट स्वच्छ करण्यासाठी आणि आतड्यांचं कार्य सुलभ करण्यासाठी खूप प्रभावी आहे. या दोन गोष्टी एकत्र घेतल्या तर पोट स्वच्छ होण्यास मदत होते. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा गाईचं तूप मिसळा. त्यात अर्धा चमचा मध घाला. झोपण्यापूर्वी ते हळूहळू प्या. यामुळे पोट स्वच्छ होतंच पण शरीराचं पोषणही होतं.
advertisement
2. त्रिफळा पावडर
त्रिफळा पावडरमुळे पचन व्यवस्था मजबूत राहते आणि आतड्याची हालचाल सुलभ करते. एक ग्लास कोमट दुधात अर्धा ते एक चमचा त्रिफळा पावडर घाला. व्यवस्थित मिसळून, मिश्रण हलवून झोपण्यापूर्वी प्या.
याचं नियमित सेवन केल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
advertisement
या उपायांमुळे पचनव्यवस्था मजबूत राहते. शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकणं तसंच बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येवर हा जालीम उपाय आहे. यामुळे त्वचा उजळते आणि शरीर हलकं वाटतं.
त्रिफळा पावडर जास्त प्रमाणात वापरल्यानं अतिसार होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल तर हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिवसभर पुरेसं पाणी प्या. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Constipation : पोट स्वच्छ ठेवण्यासाठीचा सोपा उपाय, झोपण्यापूर्वी घ्या हे औषध
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement