हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी सांगितलं की, आपल्यापैकी अनेक जण नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत. त्यामुळे शरीरात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे किंवा कोणता आजार आहे हे वेळेत लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत नवरात्रोत्सवात अचानक गरबा किंवा जोरदार नृत्य केल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
Tourist Photography: भटकंती करून मिळणार 5 लाख रुपये! पण, कुठे आणि कसे? वाचा A टू Z माहिती
advertisement
तसेच, डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले की, अनेक लोक उपवास करून गरबा करायला जातात. त्यामुळेही हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कारण गरबा हा एका प्रकारचा व्यायाम आहे. तो अचानक केल्याने शरीरावर मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
विशेष म्हणजे ज्यांच्या हृदयात ब्लॉकेज आहेत त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. नवरात्रीत गरबा किंवा जोरदार नृत्य करताना शरीरावर अचानक ताण येतो, ज्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी उत्सवाचा आनंद साजरा करत असताना स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. संजीव जाधव यांनी दिला आहे. गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणे असतात, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, डिहायड्रेशन आणि अपुरी झोप यांचा समावेश होतो.
गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी
आरोग्य तपासणी करा – गरबा खेळण्यापूर्वी तुमचे आरोग्य तपासणे महत्त्वाचे आहे. हृदयविकार किंवा इतर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गरबा टाळा.
हायड्रेट राहा – गरबा किंवा डान्स करत असताना शरीरात पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
व्यायाम आणि वॉर्म-अप - गरबा खेळायला जाण्यापूर्वी हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा.