- केस गळण्याची अनुवांशिक कारणं :
केस गळणं हे बहुतेक अनुवांशिक कारणांमुळे होते, ज्याला एंड्रोजेनेटिक एलोपेशिया म्हणतात. या अनुवांशिक स्थितीमध्ये शरीरातील हार्मोन्स, विशेषत: टेस्टोस्टेरॉन, केसांच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणतात. ही समस्या अनुवांशिक आहे, म्हणजेच कुटुंबातील कोणाला हा त्रास झाला असेल, तर पुढच्या पिढीतही हा त्रास होण्याची शक्यता असते.
2. वाढत्या वयामुळे केस गळतात:
advertisement
वाढत्या वयाबरोबर केस गळणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जे शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे होतं. वय जसजसं वाढतं तसतसं शरीरात हार्मोनल बदल होतात, त्यामुळे केसांच्या वाढीचा वेग मंदावतो आणि केसांच्या समस्या वाढतात. याशिवाय वयानुसार रक्ताभिसरणही कमी होतं. त्यामुळे केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे केस पातळ होऊन गळू लागतात. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोन्स म्हणजेच संप्रेरकांच्या असंतुलनामुळेही केस गळती वाढू शकते.
3. कर्करोगाच्या उपचारांमुळे केस गळू शकतात:
कर्करोगावरील उपचार, विशेषत: केमोथेरपी आणि रेडिएशन, केस तुटण्याचं आणि गळतीचं प्रमुख कारण असू शकतात कारण या उपचारांचा शरीरातील पेशींवर झपाट्यानं परिणाम होतो. ज्यामध्ये केसांच्या पेशींचाही समावेश होतो. केमोथेरपीची औषधं कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी कार्य करतात, परंतु ते निरोगी केसांच्या पेशींवरदेखील परिणाम करतात. त्यामुळे केस गळणं सुरू होतं. रेडिएशन ट्रीटमेंटमुळे प्रभावित क्षेत्राभोवती केसांची मुळं कमकुवत होतात. त्यामुळे केस पातळ होतात आणि तुटायला लागतात. याला "केमोथेरपी-प्रेरित अलोपेशिया" म्हणतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, उपचारानंतर केस पुन्हा वाढू लागतात, केसांची गुणवत्ता आणि रचना बदलू शकते.
4. केस गळण्याचं कारण तणाव असू शकतं:
तणाव हे केस तुटण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. कारण मानसिक तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन होते, ज्यामुळे केसांच्या वाढीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
तणावाच्या काळात शरीरात कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे केसांची वाढ रोखू शकते आणि ते कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे केस गळणं किंवा तुटण्याचं प्रमाण वाढू लागतं.
5. हार्मोनल असंतुलन:
हार्मोनल म्हणजेच शरीरातील संप्रेरकांचं असंतुलन हे केस तुटण्याचं एक प्रमुख कारण आहे, कारण शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे केसांच्या विकसनशील वर्तुळावर त्याचा परिणाम होतो. गर्भधारणा, मासिक पाळी किंवा रजोनिवृत्ती दरम्यान महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन असंतुलनामुळे केस गळू शकतात. याव्यतिरिक्त, थायरॉईड ग्रंथीच्या समस्या, जसे की हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम, केस गळतीस कारणीभूत ठरू शकतात.
निरोगी केसांसाठी काय कराल ?
1. आहार संतुलित असावा: केसांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रथिनं समृद्ध आहार घेणं आवश्यक आहे. मुख्यतः लोह, जस्त, व्हिटॅमिन डी आणि बी 12, ओमेगा -3 फॅटी ऍसिड केसांना प्रोत्साहन देतात.
2. तणाव कमी करणं: मानसिक ताण हे केस गळण्याचं प्रमुख कारण असू शकतं. योग, ध्यान आणि नियमित व्यायामाद्वारे तणाव नियंत्रित केला जाऊ शकतो.
3. केसांची योग्य काळजी घ्या: केस धुण्यासाठी रासायनिक मुक्त शॅम्पू वापरा. ओले केस विचरणं टाळा, कारण यावेळी केस अधिक नाजूक होतात.
4. तेल मालिश: खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा भृंगराज तेलानं केसांना हलकं मालिश केल्यानं रक्ताभिसरण वाढतं आणि केसांची मुळं मजबूत होतात.
5. हार्मोनल संतुलन: हार्मोनल असंतुलनामुळे केस गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य उपचार आणि औषधं घेतल्यानं स्थिती सुधारू शकते.
6. डोक्यातील कोंडा आणि टाळूची काळजी: डोक्यातील कोंडा किंवा टाळूला झालेला संसर्ग केसगळतीचं कारण असेल तर अँटी डँड्रफ शॅम्पू वापरा.
7. वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या: केस गळणं वाढलं किंवा कोणतेही विशिष्ट कारण समजलं नाही तर त्वचेच्या तज्ज्ञांशी संपर्क साधा, जेणेकरून कोणत्याही गंभीर समस्येचं निदान करता येईल.