रोज सकाळी उपाशीपोटी हे 1 फळ आवर्जुन खा, झटक्यात होईल पोट साफ, दिवसभर ताजेतवाने राहाल, जाणून घ्या इतर 5 फायदे
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सकाळी उपाशीपोटी केळी खाल्ल्याने पचन सुधारते, शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते, आणि हृदय निरोगी राहते. केळ्यामधील पोटॅशियम आणि फायबर पचन तंत्र सुधारण्यास मदत करतात. याशिवाय, व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर पोटॅशियम स्नायूंच्या ताणावर प्रभावी ठरते.
केळी हे 12 महिने उपलब्ध होणारे आणि इतर फळांच्या तुलनेत किफायतशीर फळ आहे. केळी खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. यात पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन C, B6, मॅग्नेशियम, मॅंगनीज अशा पोषक घटकांचा समावेश आहे. काही लोक सकाळी उपाशीपोटी केळी खातात, तर काही लोक टाळतात. उपाशीपोटी केळी खाण्याचे फायदे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळी उपाशीपोटी केळी खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते. केळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोट स्वस्थ राहते. फायबरमुळे आतड्यांमध्ये अडकलेला मल सैल होतो आणि शरीरातून सहजतेने बाहेर पडतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. पोट साफ ठेवण्यासाठी दररोज केळी खाणे हा सोपा उपाय आहे.
हे ही वाचा : Astrology: चांगलं झालेलं बघवणार नाही! या 5 राशींवर संकटांचे डोंगर; शनी-शुक्र उद्ध्वस्त करतील
advertisement
केळ्यामधील कर्बोदके शरीरात जाऊन त्वरित इंधनाचा स्रोत बनतात. शरीर केळ्यातील कर्बोदके ग्लुकोजमध्ये रूपांतरित करते आणि ऊर्जा म्हणून वापरते. यामुळे दिवसभर स्फूर्ती आणि सक्रियता टिकून राहते.
केळामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. शरीरात संसर्गाशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशींचे उत्पादन होते आणि पेशींना नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते.
advertisement
हे ही वाचा : Eye Care : प्रदुषणात डोळ्यांची काळजी कशी घ्याल? कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं तर जास्त खतरनाक, या 11 गोष्टी लक्षात ठेवा
नियमित केळी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो.
केळामुळे शरीरातील दाह कमी होतो. स्नायूंचा ताण जाणवत असल्यास केळी खाणे फायदेशीर ठरते. केळ्यातील पोटॅशियम स्नायूंचा ताण आणि कळ येण्यापासून बचाव करते. नियमित उपाशीपोटी केळी खा आणि तुमचे आरोग्य सुधारवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 11:26 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
रोज सकाळी उपाशीपोटी हे 1 फळ आवर्जुन खा, झटक्यात होईल पोट साफ, दिवसभर ताजेतवाने राहाल, जाणून घ्या इतर 5 फायदे