चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर काही पदार्थ खाणं उपयुक्त ठरेल, यामुळे दृष्टी सुधारेल. दृष्टीची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच कमकुवत दृष्टी तीक्ष्ण करण्याचं काम यामुळे होतं. अंडी, गाजर, सूर्यफुलाच्या बिया या अन्नपदार्थांमधून शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि ग्लूटेन चांगल्या प्रमाणात मिळतात, यामुळे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी उपयोग होतो.
advertisement
Vitamin C : थकवा घालवण्यासाठी खा फळं, उन्हाळा होईल सुसह्य
सूर्यफूल बिया
सूर्यफुलाच्या बिया डोळ्यांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ई आहे. सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यानं वृद्धापकाळामुळे डोळ्यांना होणारं नुकसान कमी होऊ लागतं. त्यामुळे मोतीबिंदूची समस्या कमी होते.
गाजर
गाजर हे बीटा कॅरोटीनचा समृद्ध स्त्रोत आहे. शरीर याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी गाजर उपयुक्त आहे.
अंडी
अंडी डोळ्यांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. अंडी प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन एचाही चांगला स्रोत आहेत. अंड्यांमधून शरीराला ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मिळतात, यामुळे दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचं संसर्गापासून संरक्षण होतं.
Periods : पाळीच्या दिवसातल्या पायदुखीवर हे उपाय करुन बघा, वेदना होतील कमी
बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी खाल्ल्यानं शरीराला व्हिटॅमिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
बदाम
सुक्या मेव्यात बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. यात अँटी-ऑक्सिडेंट असल्यामुळे, डोळ्यांच्या ऊतींचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. बदाम खाल्ल्यानं डोळे निरोगी राहतात. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर राहू लागतात.
हिरव्या पालेभाज्या
संतुलित आहारामुळे डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. या भाज्यांमध्ये पालक सर्वात उपयुक्त आहे. या दोन्ही भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते, ज्यामुळे डोळ्यांना होणारं नुकसान कमी होतं.