हार्ट अटॅकमुळे जे मृत्यू होतात ते पहिल्या काही तासातच होतात. विशेषता पहिल्या तासाला गोल्डन आवर असे म्हटले जाते. या तासात जास्तीत जास्त मृत्यू तर होतात, तर कोणाला उपचाराचा फायदा देखील मिळतो. म्हणून हार्ट अटॅकचा लवकरात लवकर निदान करणं गरजेचं असतं.
Success Story: आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केलं फूड आऊटलेट, महिन्याला तब्बल एवढी कमाई
advertisement
हार्ट अटॅकचा निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाची चाचणी म्हणजे इसीजी परंतु गाव खेड्यात इसीजी मशीन देखील उपलब्ध नसल्याने हार्ट पेशंटला लवकर उपचार मिळत नाही. तर शहरात विशेष म्हणजे मेट्रो शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी भरपूर असते. त्यामुळे हार्ट पेशंटला हॉस्पिटलला पोहोचायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या अनोख्या जॅकेटचे संशोधन केल्याचे डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी सांगितले.
हार्ट अटॅकचं निदान करण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इसीजी) अतिशय गरजेचा आहे. पेशंटच्या घरच्या घरी इसीजी काढायचं सोय झाली. तर पहिल्या तासातला गोल्डन आवरचा फायदा घेऊन रुग्णांचा जीव कसा वाचवता येईल. छातीवर आणि पोटावर शोधलेल्या पॉईंट्सचे संशोधन शिकागो येथे 2020 मध्ये वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्तोलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कॅटोलॉजी कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आले होते.
तसेच विविध अभ्यासाद्वारे हे पॉईंट नेहमी ईसीजी पॉईंट सारखेच असल्याचे सिद्ध झाले. जवळपास 1300 हून अधिक रुग्णांचा अभ्यास करून आणि पोटावरील असे पॉईंट शोधले. डॉक्टर गुरुनाथ परळे यांना ग्रामीण भागापर्यंत हे उपकरण पोहोचवायचे आहे. साधारणतः या जॅकेटची किंमत आठ ते दहा हजार रुपये पर्यंत असणार आहे. नुकतेच पेटंट मिळाले आहे.





