Success Story: आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केलं फूड आऊटलेट, महिन्याला तब्बल एवढी कमाई

Last Updated:

आयटी क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हर्षल चौधरी यांनी मेहनत, चिकाटी आणि नवकल्पनांच्या जोरावर एक वेगळी वाट निवडली आहे.

+
News18

News18

मुंबई: आयटी क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या हर्षल चौधरी यांनी मेहनत, चिकाटी आणि नवकल्पनांच्या जोरावर एक वेगळी वाट निवडली आहे. महिममध्ये राहणाऱ्या हर्षल यांनी माटुंगा रोड येथे स्वतःचा खादाड नावाने फूड आऊटलेट सुरू केलं आणि आज त्यांच्या आऊटलेटला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सुरुवातीला त्यांचा मेन्यू खूप साधा आणि कमी होता फक्त 2-4 सँडविचेस, फ्राइज आणि रॅप्स. पण चवदार फूड आणि दर्जेदार सेवा यामुळे त्यांचा फूड शॉप लोकप्रिय झाला. फूड किंमत केवळ 25 रुपयांपासून सुरू होते, जी विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी अत्यंत परवडणारी आहे. यांचा बेस्ट-सेलिंग फूड म्हणजे चीज किमा पाव आहे.
advertisement
हर्षल यांच्या ग्राहकांना उत्कृष्ट स्वाद आणि फ्रेश फूड मिळतं, ज्यामुळे ते त्यांच्या व्यावसायिक प्रवासात यशस्वी ठरले. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता, त्यांनी दुसरे आउटलेट सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला खूप चॅलेंजेस आले, पण स्वतःसाठी काम करत असताना जो आनंद मिळतो, तो अनमोल आहे.
advertisement
त्यांच्या व्यवसायाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मेन्यू आता विस्तारला आहे. ग्राहकांच्या मागणीच्या आधारावर नवनवीन पदार्थ जोडले गेले आहेत. आज ते महिन्याला 60 हजार कमवतात. महिम पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या ह्या आउटलेटमध्ये हे सर्व पदार्थ ताजे, चवदार आणि कमीत कमी किमतीत मिळतात. माटुंगा रोडवरून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर हा आउटलेट आहे.
advertisement
हर्षल चौधरी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनतीने काम करत राहा.  आयटी क्षेत्रातून खाद्य व्यवसायात यशस्वी झेप घेतल्यामुळे, हर्षल चौधरींची ही कहाणी खऱ्या अर्थाने स्वप्नांची उड्डाण आहे.
मराठी बातम्या/मनी/
Success Story: आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केलं फूड आऊटलेट, महिन्याला तब्बल एवढी कमाई
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement