Women Success Story: सातवीत असतानाच वडिलांचं छत्र हरपलं, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 60000 कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Women Success Story: त्यातच घराची परिस्थिती बिकट असल्यामुळे घराला हातभार लागावा याकरता हिना शेख यांनी कमी वयातच पैसे कमावण्याची उमेद मनात धरली.
नाशिक: सातवीत असतानाच वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपले. त्यातच घराची परिस्थिती बिकट असल्यामुळे घराला हातभार लागावा याकरता हिना शेख यांनी कमी वयातच पैसे कमावण्याची उमेद मनात धरली. अंगात कला असल्याने साडीवर डिझाईन करून विक्री करणे, तसेच मेहंदी काढून देणे असे अनेक काम हिना करत असे.
आता हिना नाशिकमध्ये तब्बल 7 ते 8 प्रकारचे विविध स्किल क्लासेस सुद्धा घेत असतात आणि या माध्यमातून त्या स्वतः देखील रोजगार मिळवत आहेत आणि इतरांना देखील देत असल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
लहानपणीच वडिलांचा हात डोक्यावरून जाणे हाच खूप मोठा धक्का असतो आणि हेच सर्व हिना यांनी देखील सहन केले. वडील गेल्यानंतर काकांनी सांभाळ केला, परंतु शिक्षण आणि लहान बहिणीची संपूर्ण जबाबदारी आईवर पडली. घरातील मोठी असल्याने आपणच आईला मदत करू याकरता शाळा शिकत असताना हिना या छोट्या-मोठ्या मेहंदीच्या ऑर्डर घेऊ लागल्या. 200 रुपयात सुरुवात केलेल्या या क्षेत्रात कमी वयातच चांगली ओळख हिना यांना मिळाली.
advertisement
बाहेरचे काम करत त्यांनी आपले शिक्षण देखील पूर्ण केले. हळूहळू मेहंदीच्या क्लास, त्यानंतर ड्रॉईंग क्लास, साडीवर डिझाईन बनवणे असे ते इतरांना देखील शिकवू लागल्या. त्याचबरोबर स्वतःचे एम.ए पूर्ण करून आयटीआय डिप्लोमा देखील त्यांनी केला आणि गेल्या 10 वर्षांपासून त्या नाशिकमधील एका शाळेत शिक्षिका देखील आहेत.
advertisement
आज हिना या मेहंदी क्लासेस, आरिवर्क क्लासेस, पेंटिंग क्लासेस, रेजिन क्लासेस, केक क्लासेस, कॅलिग्राफी क्लासेस घेत असतात. त्याचबरोबर त्या केक देखील बनवून विक्री करत असतात. त्याचबरोबर शिकवणीसाठी आलेल्या लेडीज देखील त्यांचे प्रोडक्ट यांच्या माध्यमातून विक्री करत असतात. यामधून त्यांना महिन्याकाठी 60 कमाई होते.
advertisement
तुम्हाला देखील यांचे बनवलेले डिझाइन तसेच केक ऑर्डर करावयाचे असल्यास त्यांच्या हिना आर्टिस्ट टच या इंस्टा तसेच फेसबुक पेजवर तुम्ही नक्की भेट द्या. तसेच कुणाला यांच्याकडून या गोष्टींचा क्लास करायचा असल्यास शफ़ात बंगलो, केरू पाटील नगर, नियर एमसीबी सबस्टेशन, बोराडे मळा, जेल रोड, नासिक रोड या ठिकाणी भेट देऊ शकतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 19, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/नाशिक/
Women Success Story: सातवीत असतानाच वडिलांचं छत्र हरपलं, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 60000 कमाई