TRENDING:

अनेकजण सकाळी पाणी पितात, पण एकच चूक करतात; तुम्हाला माहितीये ना योग्य पद्धत?

Last Updated:

या पाण्यामुळे पचनासंबंधित सर्व समस्या मूळापासून दूर होतात. अन्नपचन व्यवस्थित झाल्याने गॅसचा त्रास होत नाही, शिवाय टाकाऊ पदार्थ सुरळीतपणे शरिराबाहेर पडतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशिकांत ओझा, प्रतिनिधी
काही अशा ठराविक वेळा आहेत जेव्हा प्यायलेल्या पाण्याचा शरिराला विशेष फायदा होतो.
काही अशा ठराविक वेळा आहेत जेव्हा प्यायलेल्या पाण्याचा शरिराला विशेष फायदा होतो.
advertisement

पलामू : पाणी हे जीवन आहे, असं उगीच म्हणत नाहीत. सुदृढ शरिरासाठी त्याला पुरेसं पाणी मिळणं अत्यावश्यक असतं. पाण्यामुळे शरिरात ओलावा राहतो म्हणजेच ते हायड्रेट राहतं. परंतु काही अशा ठराविक वेळा आहेत जेव्हा प्यायलेल्या पाण्याचा शरिराला विशेष फायदा होतो. त्यापैकीच एक म्हणजे सकाळी ब्रश न करता पाणी पिणं.

आयुर्वेदिक डॉक्टर पुरुषार्थी पवन आर्या सांगतात की, सकाळी ब्रश न करता उपाशीपोटी पाणी पिणं आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं. त्यामुळे आतड्या स्वच्छ होतात, शरीर छान ऊर्जावान राहतं, हळूहळू वजन कमी होण्यास मदत मिळते, अर्थातच स्थूलपणा दूर होतो. आपल्या तोंडात रात्रभर लाळ तयार झालेली असते. सकाळी कोमट पाणी प्यायल्यास या पाण्यासोबत सगळी लाळ पोटात जाते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

advertisement

आधी पाणी की दूध? 'असा' बनवा परफेक्ट चहा! आलं, वेलची घालायचं असेल तर...

सकाळी झोपेतून उठल्यावर प्यायलेल्या पाण्यामुळे नेमकं काय होतं?

  • या पाण्यामुळे पचनासंबंधित सर्व समस्या मूळापासून दूर होतात. अन्नपचन व्यवस्थित झाल्यामुळे गॅसचा त्रास होत नाही, शिवाय टाकाऊ पदार्थ सुरळीतपणे शरिराबाहेर पडतात.
  • जर तुम्ही दररोज सकाळी ब्रश करण्याआधी पाणी पित असाल तर तुमचा आळस हळूहळू पूर्ण दूर होईल. दिवसभर तुम्ही छान ऊर्जावान राहाल. शिवाय तुमची सगळी कामं वेळच्या वेळी पूर्ण होतील.
  • advertisement

  • स्थूलपणा दूर होण्यास मदत मिळते. कारण या पाण्यामुळे शरिरातील कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन आपसूक कमी होतं.
  • या पाण्यामुळे आतड्यांमध्ये चिकटलेली बारीक बारीक घाण शरिराबाहेर पडते. ज्यामुळे केवळ अन्नपचन व्यवस्थित होत नाही, तर आतड्यांमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासूनही आरोग्याचं रक्षण होतं.

टूथपेस्ट बदलली, तरी तोंडाचा वास जाईना? ही दुर्गंधी श्वासांची; आता उपाय एकच!

advertisement

लक्षात घ्या, शरिरात पाण्याची कमतरता म्हणजे रोगांना निमंत्रण. कारण आजार तेव्हा जडत नाहीत जेव्हा पूर्ण शरीर स्वच्छ आणि सुदृढ असतं आणि पाणी हे शरीर स्वच्छ करण्याचं काम करतं. शरिरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणात सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतो. त्वचा निस्तेज आणि रुखरुखीत दिसू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर कायम तेज हवं असेल तर भरपूर पाणी प्यावं.

advertisement

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
अनेकजण सकाळी पाणी पितात, पण एकच चूक करतात; तुम्हाला माहितीये ना योग्य पद्धत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल