आधी पाणी की दूध? 'असा' बनवा परफेक्ट चहा! आलं, वेलची घालायचं असेल तर...

Last Updated:

चहाला अनेकजण ऊर्जास्रोत मानतात. कारण एक कप चहामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. सगळा आळस दूर होतो.

थंडीत अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो.
थंडीत अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो.
रामकुमार नायक, प्रतिनिधी
रायपूर : अनेकजणांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळचा चहा म्हणजे काहीजणांसाठी जीव की प्राण असतो, तो जर मिळाला नाही, तर दिवसभर त्यांना काही सुचेनासं होतं. तर काहीजणांना दिवसभरातून कधीही सुचेनासं झालं की ते चहा पितात. चहाचे वेगवेगळे प्रकार असतात, कोरा चहा, दुधाळ चहा, मसाला चहा, गवती चहा, इत्यादी. तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीये का, प्रत्येक घरातल्या चहाची चव वेगवेगळी असते. इतकंच काय, घरातल्या प्रत्येकाच्या हातच्या चहाची चवही वेगळी असते. त्याचं कारण म्हणजे चहामध्ये मिसळल्या जाणाऱ्या पदार्थांचं प्रमाण.
advertisement
चहाला अनेकजण ऊर्जास्रोत मानतात. कारण एक कप चहामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. सगळा आळस दूर होतो. काहीजणांना कमी साखरेचा चहा आवडतो. परंतु जवळपास सर्वांनाच कडक असा वाफाळता चहा हवा असतो. त्यामुळे आज आपण चहाची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत.
advertisement
टपरीवर जसा चहा मिळतो तसा स्वादिष्ट चहा बनवण्यासाठी पाणी कमी, दूध जास्त, साखर, चहापावडर आणि आलं घ्यावं. सर्वात आधी पातेल्यात दूध घ्यायचं, मग चहापावडर आणि साखर घालून शेवटी पाणी ओतून आलं घालावं. या मिश्रणाला उकळी आली की, एक अतिशय स्वादिष्ट असा चहा बनून तयार होईल.
advertisement
थंडीत अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो. आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला असतो. तर, उन्हाळ्यात लोक जास्तीत जास्त वेलचीचा चहा पितात. आल्याचा असो किंवा वेलचीचा चहा असो. हे पदार्थ चहामध्ये शेवटी घालायचे ज्यामुळे त्यांची चव जशीच्या तशी उतरते.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा 
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आधी पाणी की दूध? 'असा' बनवा परफेक्ट चहा! आलं, वेलची घालायचं असेल तर...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement