ग्रीन नाही, Blue tea प्यायलाय? पिरियड्सपासून डोकेदुखीवर रामबाण, वजनही करतो कमी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
या चहामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती भक्कम होते. शिवाय या चहामुळे शरिरातले टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यासही मदत मिळते.
भरत तिवारी, प्रतिनिधी
जबलपूर : सकाळी बिछान्यातून उठल्यावर अनेकजणांच्या तोंडात सर्वात आधी शब्द येतो 'चहा'. भारतात दररोज सकाळी असंख्य लोक चहा पितात. कोणाला कोरा चहा आवडतो, कोणाला आल्याचा चहा आवडतो, कोणाला दुधाळ चहा आवडतो, तर कोणाला कमी साखरेचा चहा आवडतो. अनेकजण गवती चहा पितात, अनेकजण ग्रीन टी पितात, पण तुम्ही कधी ब्लू टी प्यायलाय का?
advertisement
चहा हा आरोग्यासाठी हानीकारक असतो असंच आपण आतापर्यंत ऐकलं असेल, परंतु ग्रीन टी मात्र वजन नियंत्रणात राहावं म्हणून प्यायला जातो. आता ब्लू टी हा नेमका काय प्रकार आहे, पाहूया.
हा चहा गोकर्ण म्हणजेच अपराजिताच्या फुलांपासून बनवला जातो. ही फुलं औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे त्यांपासून बनवलेल्या या चहामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती भक्कम होते. शिवाय या चहामुळे शरिरातले टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यासही मदत मिळते.
advertisement
ब्लू टीमुळे डोकेदुखी, मासिकपाळीत होणारा त्रास, अंगदुखी, अशक्तपणा, विस्मरण, दमा, खोकला, इत्यादींसह मानसिक ताणावरही आराम मिळतो. महत्त्वाचं म्हणजे या चहामुळे वजनसुद्धा कमी होतं. मध्यप्रदेशच्या जबलपूर भागात अंकित राजपूत हे मागील 50 वर्षांपासून ब्लू टीचा व्यवसाय करतात. ग्राहकांकडून या चहाला मोठी मागणी मिळते. या चहाला 'सुकून टी' असंदेखील म्हणतात.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Jabalpur,Madhya Pradesh
First Published :
February 15, 2024 6:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ग्रीन नाही, Blue tea प्यायलाय? पिरियड्सपासून डोकेदुखीवर रामबाण, वजनही करतो कमी