टूथपेस्ट बदलली, तरी तोंडाचा वास जाईना? ही दुर्गंधी श्वासांची; आता उपाय एकच!

Last Updated:
आपण बराच वेळ शांत बसलो की, तोंडातून एक दुर्गंध येऊ लागतो. म्हणूनच आपण दुपारच्या झोपेनंतर चूळ भरतो आणि प्रवासात आंबट गोळ्या सोबत ठेवतो. परंतु हे कधीतरी होणं सामान्य आहे, मात्र काही लोकांच्या तोंडाला वर्षाचे बारा महिने दुर्गंधच असतो. मग त्यांनी कितीही टूथपेस्ट बदलल्या किंवा नको नको ते माऊथ फ्रेशनर वापरले तरी तोंड उघडताच वासच वास येतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही खालावतो, मग यावर उपाय तरी काय? उपाय अगदी सोपा आहे.
1/5
तज्ज्ञमंडळी आवळ्याला ‘सूपर फूड’ मानतात. कारण त्यात अनेक पौष्टिक तत्त्व असतात. तुकतुकीत त्वचेपासून लांबसडक केसांपर्यंत आवळा शरिरासाठी अत्यंत उपयुक्त असतो. काहीजणांना नुसता आवळा खायला आवडत नाही पण आवळ्याची चटणी किंवा मुरंबा जवळपास सर्वजण आवडीने खातात.

advertisement
2/5
आवळ्यात व्हिटॅमिन सी, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियमसह अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. महत्त्वाचं म्हणजे आवळ्यामुळे वजनही कमी होतं. शिवाय मधुमेहात तो फायदेशीर ठरतो. मासिकपाळीतला त्रासही आवळ्यामुळे कमी होतो.

3/5
उत्तराखंडच्या चमोली भागातील डॉ. रजत सांगतात की, आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे विविध आजारांपासून शरिराचं रक्षण होतं. तसंच तोंडात झालेली प्रत्येक जखम आवळ्यामुळे बरी होते. आवळ्यामुळे श्वासांची दुर्गंधीही दूर होते. अर्थातच आवळा खाल्ल्यास तोंडातून उग्र वास येत नाही. तसंच आवळ्यात क्रोमियम नावाचं तत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

4/5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आवळ्यामुळे हृदयाचं आरोग्यही सुदृढ राहतं. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. शिवाय युरिन इंन्फेक्शनवरही आराम मिळतो. डॉक्टर सांगतात की, जेवणापूर्वी दही आणि मधासोबत आवळ्याची पावडर खावी, त्यामुळे पचनासंबंधित सर्व समस्या दूर होतात. परंतु आवळा अत्याधिक प्रमाणात खाऊ नये, असंही डॉक्टर सांगतात.

5/5
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement