TRENDING:

Health Tips: वेळेत जेवण करा, प्रकृती राहील ठणठणीत, आरोग्यासाठी फायदेशीर टिप्स

Last Updated:

रात्रीचं जेवण लवकर करण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रात्रीचं जेवण रात्री नऊ वाजेपर्यंत करावं, यापेक्षा जास्त उशीर करणं प्रकृतीसाठी योग्य नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लवकर निजे, लवकर उठे, तयासि धन, संपत्ती, आरोग्य लाभो हे आपण कायम ऐकतोय. पण त्याचबरोबर लवकर जेवण्यामुळेही प्रकृती उत्तम राहते. रात्रीचं जेवण लवकर करण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रात्रीचं जेवण रात्री नऊ वाजेपर्यंत करावं, यापेक्षा जास्त उशीर करणं प्रकृतीसाठी योग्य नाही.
News18
News18
advertisement

शहरी जीवनशैलीत रात्री उशिरा जेवण करणं सामान्य आहे, पण आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. एका अभ्यासानुसार रात्री उशिरा अन्न खाल्ल्यानं चयापचय बिघडणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळी सात वाजता जेवण केल्यानं आरोग्याला सर्वाधिक फायदा होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार  जेवण आणि रात्रीची झोप यात दोन ते तीन तासाचं अंतर असावं.

Tanning: टॅनिंग कमी करण्यासाठी करा हा उपाय, घरी करा मेनिक्युअर आणि पेडिक्युअर

advertisement

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

चांगलं पचन: रात्री उशिरा रात्रीचे जेवण केल्यानं आपल्या पचनसंस्थेला अन्नाचं चयापचय होण्यास कमी वेळ मिळतो. यामुळे, पोट फुगणं, अपचन आणि ऍसिड रिफ्लक्स यासारख्या पचन समस्या उद्भवू शकतात. लवकर अन्न खाल्ल्यानं, झोपण्यापूर्वी शरीराला अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. रात्रीचं जेवण लवकर केल्यानं, झोपण्यापूर्वी अन्न पचतं ज्यामुळे आपल्याला हलकं वाटतं.

advertisement

हृदय: रात्री उशिरा खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. झोपण्यापूर्वी लवकर अन्न खाल्ल्यानं शरीराला रक्तातील साखर आणि चरबी शोषण्यास पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे आपल्या हृदयाला फायदा होतो. रात्रीचं जेवण वेळेत खाल्ल्यानं तुमचा भविष्यात गंभीर समस्यांपासून बचाव होतो.

Green Facepack : चेहऱ्यावरच्या 'ग्लो' साठी उत्तम उपाय, वापरा ग्रीन फेसपॅक

advertisement

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर : रात्री लवकर अन्न खाण्यानं केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. रात्री उशिरा जेवल्यानं दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू शकतो, तर रात्रीचे जेवण लवकर केल्यानं शरीर आणि मन संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो आणि दिवसभर एनर्जी राहते.

चांगली झोप : रात्री उशिरा अन्न खाल्ल्यानं आपलं शरीर अन्न पचवण्यावर लक्ष केंद्रित करतं, त्यामुळे शरीराला आराम मिळत नाही आणि आपल्याला नीट झोपही येत नाही. रात्री लवकर जेवण केल्यानं झोपण्यापूर्वी अन्नाचं पचन होतं, त्यामुळे झोपताना शरीर रिलॅक्स राहतं. झोप गाढ लागते. जे लोक रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत काही खातात त्यांच्या झोपेच्या पद्धतीत अनियमितता दिसून आली.

advertisement

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त: आपलं शरीर दिवसभर वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीज बर्न करतं आणि रात्रीचं जेवण लवकर खाण्याची सवय असेल तर रात्री लवकर जेवण केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. रात्रीचं जेवण लवकर खाल्ल्यानं शरीरातील कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होण्यास मदत होते, तर रात्रीचं जेवण उशिरा खाल्ल्यानं चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. डाएटिंग न करता वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रात्री लवकर जेवण करण्याची सवय लावा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: वेळेत जेवण करा, प्रकृती राहील ठणठणीत, आरोग्यासाठी फायदेशीर टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल