मुंबई: सध्याच्या काळात अनेकांसाठी मोबाईल आणि सोशल मीडिया हे जणू व्यसनच झाले आहे. अनेकजण मोबाईलवर रिल्स आणि शॉर्ट्स पाहण्यात तासनतास घालवत असतात. तर काहीजण अगदी झोपताना देखील रिल्स पाहत असतात. परंतु, त्यामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्याचा मानसिक आरोग्याला देखील फटका बसू शकतो. याबाबतच मुंबईतील मनोचिकित्सक डॉ. गौरी राऊत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
आजच्या युगात मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजच्या डिजिटल जगात, एकीकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेटने काम सोपे केले आहे. मात्र, तेच दुसरीकडे हेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजे मोबाईल सारख्या वस्तू नुकसान देखील करू शकतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत मोबाईल हे व्यसन झाले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्याला फटका बसत असून विविध आजार बळावत आहेत, असं डॉ. राऊत सांगतात.
मुलींना आवडायचा सॉस, आईनं उद्योगच थाटला, आता घरातूनच होतेय 25 लाखांची कमाई
आरोग्याला फटका
सोशल मिडिया वापरणाऱ्या प्रत्येकालाच आजकाल रील्स पाहण्याचं व्यसन लागलं आहे. अनेकजण तासनतास रील्स बघत असतात. मात्र, हे व्यसन मोठ्याप्रमाणात धोकादायक ठरताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत सतत रील्स पाहणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के लोक निद्रानाश, डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. तसंच यामुळे उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजारही जडू शकतात. ज्यामध्ये किशोरवयीन मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्तींना असे मानसिक आजार होण्याची शक्यता असते. डोकेदुखी, डोळ्यात वेदना होणे, झोपताना डोळ्यांत चमक जाणवणे या सारख्या आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो, असे डॉक्टर सांगतात.
उपाय काय?
मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या आजारांवर मोबाईलचा शक्यतोवर कमी वापर करणे हाच चांगला उपाय आहे. गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरावा. त्याऐवजी कुटुंबासोबत वेळ द्यावा. आवडती पुस्तके वाचावीत. जवळच्या व्यक्तींना, मित्रांना भेटावे. लोकांशी संवाद साधत राहावे. तसेच मेडिटेश, व्यायाम करावा, असे डॉक्टर गौरी सांगतात.