आज 8 मार्च...जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो आहे. पण अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडताना महिला स्वत:ची काळजी घेणं विसरतात, अनेकदा दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आरोग्याला जपा. कुटुंब आणि कामाबरोबर स्वत:कडेही लक्ष द्या. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं अत्यावश्यक आहे, त्यामुळे व्यक्त व्हा. शरीराच्या व्याधींसारखेच मनाच्या व्याधींसाठीही तज्ज्ञ असतात. त्यांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
Mosquito Repellent : डासांना वैतागलात ? हे उपाय नक्की करा, घरीच बनवा मॉस्किटो रिपेलेंट
काही स्त्रिया शारीरिक समस्या, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या शरीरातील बदलांकडेही दुर्लक्ष करतात, आणि नंतर समस्या गंभीर झाल्यानं त्रास वाढतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. याची सुरुवात आहारापासून होते. पाहूयात यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या टिप्स.
1. प्रथिनं-
स्वत:ला निरोगी ठेवायचं असेल महिलांनी आपल्या आहारात प्रथिनांचा समावेश करणं आवश्यक आहे. यासाठी नाश्त्यात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करु शकता.
2. फळ-
महिलांनी त्यांच्या आहारात फळांचा समावेश करावा. फळांमधली पोषक तत्व शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात.
Uric Acid: युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी वापरा हे पदार्थ, कोथिंबीर - पुदिना चटणीचा होईल उपयोग
3. पाणी-
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे महिलांनी पुरेसं पाणी प्यावं. नारळपाणी, ज्यूस यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.
४. व्यायाम-
शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ आहारच नाही तर व्यायामही महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ महिलांनीच नाही तर प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे.
5. घरगुती उपचार-
आरोग्यासोबतच महिलांनी त्वचेचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. त्वचेसाठी घरगुती उपाय करून पाहता येतील. त्वचेसाठी मुख्य आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आणि स्वत:ला वेळ द्या !