कोलेस्टेरॉल म्हणजे नक्की काय ?
कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा ते हानिकारक ठरू लागते. शरीरात चांगले कोलेस्टेरॉल, वाईट कोलेस्टेरॉल आणि एकूण कोलेस्टेरॉल असते. चांगल्या कोलेस्टेरॉलला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि खराब कोलेस्टेरॉलला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणतात. वास्तविक, कोलेस्टेरॉल हा लिपोप्रोटीन नावाचा चरबीचा प्रकार आहे. लिपोप्रोटीनचे दोन प्रकार आहेत कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) आणि उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL). शरीरात HDL चे प्रमाण वाढणे चांगले मानले जाते, तर दुसरीकडे, LDL चे प्रमाण वाढणे आपल्या शरीरासाठी खूप वाईट मानले जाते.
advertisement
मूकबधीर व्यक्ती हाताने इशारा करणार अन् तो व्हाईस मेसेजने तुम्हाला कळणार, भन्नाट असं यंत्र
ही असतात लक्षणे
कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यावर आपल्या छातीत मुख्यता डाव्या बाजूला दुखणे, अति थकवा येणे, चक्कर येणे हातापायाला मुंग्या येणे असे बरेच प्रकार आढळून येतात. या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास बीपीचा त्रास किंवा बीपी आजाराशी संबंधित हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज, पॅरालिसिस, असे आजार देखील उद्भवत असतात. कोलेस्टेरॉल वाढण्यास आपले दैनंदिन धकाधकीचे जीवन, जीवनशैली, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या पद्धती, अपुरा सकस आहार ही काही मुख्य कारणे आहेत. यामधून आपल्या शरीरात हळूहळू कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत जाते आणि ठराविक वेळेनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. त्यावर उपचार केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात देखील आणू शकतो, अशी माहिती डॉ. आखारे यांनी दिली.
कोलेस्टेरॉल मुक्तीसाठी खास टिप्स
दैनंदीन जीवनातील आहारात फायबर, प्रोटीन्स, प्रथिने, हिरवा पालेभाज्या आदी सकस आहाराचा समावेश करावा. जंक फूड, फास्ट फूड इत्यादी सारख्या खाद्य पदार्थांचे सेवन प्रमाणात करावे. जेणेकरून आपण निरोगी राहू शकता. धूम्रपान, मद्यपान इत्यादी सारखे व्यसनाचे मानवी आरोग्यावर फार विपरीत परिणाम होत असतात. त्यावर नियंत्रण असणे गरजेच आहे. दैनंदिन जीवनातील आपल्या वेळेचे व्यवस्थापन ही देखील शरीरासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे.
जागतिक किर्तीचा खेळाडू विकतोय चहा, पाहा का आली अशी वेळ?
आहार, पाण्याची काळजी घ्या
सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणाची, न्याहरीची वेळ ठरवून त्या नुसार आपण ती वेळ पाळली पाहिजे. रात्रीची झोप हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किमान 6-7 तास रात्रीची झोप मानवी शरीराला गरजेची असते. पाणी हे अनेक आजारांचे कारण ठरत असते. मात्र दिवसाला किती पाणी प्यावे याची काळजी घेतली पाहिजे. जसे की प्रति व्यक्ती 20 किलो वजनासाठी 1 लिटर तर 40 किलो वजनासाठी 2 लिटर पाणी हे प्रमाण आवश्यक आहे. तणाव रहित आयुष्य जगणे, रोज योगा व्यायाम, मेडीटेशन इत्यादी गोष्टीचे पालन केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपण नियंत्रणात आणू शकतो, अशी माहिती डॉ. आखारे यांनी दिली.