आपल्याकडे हळद ही एक मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरली जाते. पण हीच हळद आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानली जाते. अनेक आजारांवरती ती फायदेशीर ठरते. हळदीमध्ये कर्क्यूमिन ऑईल हे फायटो केमिकल्स असतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. आपलं आरोग्य संवर्धनासाठी कर्क्यूमिन फायदा होतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी पिलं तर आरोग्यास अत्यंत फायद्याचं ठरतं. कॅन्सरसारखा आजार रोखण्याची ताकद त्यात असते, असं मंजू मठाळकर सांगतात.
advertisement
Weight Loss: रोज जिम करून देखील वजन कमीच होत नाही? मग ही त्रिसूत्री माहितीच हवी!
हळदीसोबत काळी मिरी
हळदी आपल्या सौंदर्यासाठी देखील फायदेशीर ठरते. आपण जर रोज सकाळी हळदीचे पाणी घेतलं तर आपली त्वचा देखील यामुळे चांगली होते. जर तुम्ही हळदीचे पाणी घेत असाल तर त्यात थोडीशी मिरी पावडर टाकल्यास त्याचा दुहेरी फायदा होता. त्यासाठी सकाळी गरम पाणी करून त्यात हळद टाकायची. तसेच यामध्ये चिमुटभर मिरे पावडर टाकून ते पाणी प्यायचं. याचा खूप फायदा होतो, असंही मंठाळकर सांगतात.
दरम्यान, अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर वर्षानुवर्षे केला जातोय. वजन कमी करण्यासाठीही हळद फायदेशीर आहे. हळदीत अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी आहेत, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.