Weight Loss: रोज जिम करून देखील वजन कमीच होत नाही? मग ही त्रिसूत्री माहितीच हवी!

Last Updated:

Weight Loss Tips: वजन वाढ ही सध्याच्या काळात अनेकांची समस्या झाली आहे. तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर व्यायाम, आहार आणि विश्रांती ही त्रिसूत्री महत्त्त्वाची असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

+
Weight

Weight Loss Tips: वजन कमी करण्याची त्रिसूत्री, जिम केल्यानं फायदा होतो का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष झालं, की त्याचे परिणाम लगेच दिसू लागतात. त्यामुळे वजनवाढ हा सामान्य पण गंभीर प्रश्न बनला आहे. यावर उपाय म्हणून अनेकजण थेट जिममध्ये घाम गाळतात. अनेकांना वाटतं की फक्त जिमला गेल्याने वजन आपोआप कमी होईल, पण ही अर्धवट समजूत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मुंबईतील अनुभवी जिम प्रशिक्षक अविनाश कातळकर यांच्याकडून याबाबत जाणून घेऊ.
व्यायाम
कातळकर सांगतात की, "वजन कमी करणं म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर संपूर्ण जीवनशैली सुधारण्याची प्रक्रिया आहे. वजन कमी होण्यामागे 70 टक्के डायट, 20 टक्के व्यायाम आणि 10 टक्के विश्रांती हे तीन घटक काम करत असतात. जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम असतात. कार्डिओ, वेट ट्रेनिंग, HIIT हे सर्व प्रकार शरीरातील कॅलरी जाळतात, स्नायूंना बळकटी देतात, आणि शरीर अधिक सक्रिय ठेवतात.
advertisement
आहार 
आहार चुकीचा असेल तर वजन कमी होणं कठीण बनतं. साखरयुक्त, तळलेले, तेलकट, आणि प्रोसेस्ड पदार्थ खाल्ले जात असतील, तर व्यायामाचा पूर्ण फायदा मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ‘कॅलरी डेफिसिट’ आहे. तुम्ही जितकं खात आहात त्यापेक्षा जास्त ऊर्जा खर्च केली पाहिजे. यासाठी प्रथिनंयुक्त, फायबरयुक्त, आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.
advertisement
विश्रांती
तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 7-8 तास झोप घेणं, भरपूर पाणी पिणं, मानसिक तणाव कमी करणं, आणि नियमित वेळेवर जेवण घेणं हे देखील शरीराच्या चयापचयावर परिणाम करतं.
दरम्यान, वजन कमी करण्यासाठी या त्रिसूत्रीवर लक्ष दिल्यास पद्धतशीरपणे महिन्याला 4 ते 5 किलो वजन कमी करणं शक्य आहे. तसेच 3 महिन्यांत 10 ते 15 किलो वजन घटवता येऊ शकतं. म्हणूनच, वजन कमी करण्याचा खरा मंत्र म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि शिस्तबद्ध जीवनशैली आहे, असंही कातळकर सांगतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss: रोज जिम करून देखील वजन कमीच होत नाही? मग ही त्रिसूत्री माहितीच हवी!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement