छत्रपती संभाजीनगर : आपल्या आहारात दुधाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे रोजच्या आहारात दुधाचा समावेश केला जातो. काहीजण दूध रोज पितात. तसेच मखाना देखील अत्यंत पोषक मानला जातो. बऱ्याचदा मखाने आणि दूध एकत्र घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. हे दोन्ही एकत्र घेतल्यास शरीराला चांगेल फायदा होतो. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिलीये.
advertisement
दूध-मखाने पिण्याचे फायदे
दुध आणि मखाने एकत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत. यातून आपल्याला भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक भेटतात. ज्या लोकांना ताणतणाव असेल, ज्यांची हेक्टिक जीवनशैली असेल अशा सर्वांनी सकाळी दुधात मखाने टाकून खाल्ले तर त्यांचा ताण कमी व्हायला मदत होते. त्यासोबतच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी देखील त्याचा फायदा होतो. हिवाळ्यामध्ये शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध मखाने एकत्र घेणं हा उत्तम पर्याय आहे.
भूक लागत नसेल तर..
ऍसिडिटी, अपचन, भूक मंदावणे किंवा भूकच न लागणे अशा समस्या काहींना जाणवतात. त्यांनी रोज सकाळी नाश्त्यामुधेय दूध आणि मखाने खाल्ल्यास लाभदायी ठरते. त्यांचे सगळे व्याधी दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच ज्या मुलांना उंची वाढवायची आहे त्यांच्यासाठी कॅल्शिअमचा स्त्रोत असणारा आहार आवश्यक असतो. त्यांनी आवर्जून दूध मखाने खावेत. त्याच्यासोबत एक चमचा खारकेची पावडर मिक्स करून दिली तर हे अत्यंत फायदेशीर ठरतं. तसंच ज्यांना विसराळूपणा असेल, गोष्टी लक्षात राहत नसतील अशांनी जर दुधात मखाने टाकून खाल्ले तर त्यांची स्मरणशक्ती चांगली राहायला मदत होते, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
कसे खावेत दूध मखाने?
मखाने आणि दूध तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्यायचे आहे. जर तुम्ही शंभर ते दीडशे मिली दूध म्हणजे एक ग्लास भरून दूध घेतला असेल तर त्यामध्ये तुम्ही 30 ग्रॅम मखाने टाकून खाऊ शकता. हेच प्रमाण लहान मुलांसाठी त्यांना एक कप दुधामध्ये तुम्ही 15 ग्रॅम मखाने टाकावेत. अशाप्रकारे दूध मखाने खाल्ल्यास आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल, असंही आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.
(सूचना : या बातमीमध्ये दिलेली माहिती ही तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)