बोकारो : होळीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. होळीच्या आगीत सर्व राग, रुसवे आणि मतभेदांचं दहन केल्यानंतर धूलिवंदनाला सर्वजण आनंदाने एकमेकांना रंग लावतील. या रंगांच्या खेळात अनेकजण भांग पितात. आता ही जणू बऱ्याच वर्षांची परंपरा झाली आहे. परंतु धूलिवंदनाच्या सणाला लोकांच्या आनंदाला काही पारावार उरलेला नसतो, अशात जास्त प्रमाणात भांग पोटात गेल्यास आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मानसिक तणाव, निद्रानाश, इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याबाबत डॉक्टर काय सांगतात पाहूया.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर राजेश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांग प्यायल्यानंतर तिची नशा दूर करण्यासाठी नारळपाणी रामबाण मानलं जातं. कारण त्यामुळे पोटाला गारवा मिळतो आणि मन शांत होतं. भांग प्यायल्यामुळे बऱ्याचदा व्यक्ती अस्वस्थ होते. तेव्हा दोन लिंबांचा रस आणि चमचाभर मीठ मिसळून ग्लासभर पाणी प्यायल्यास आराम मिळतो.
हेही वाचा : किचनमधले काही पदार्थ दररोज खाऊ नये, नाहीतर आजारपण लागतं पाठीशी
भांगेची नशा खूप जास्त असेल, तर मानसिक स्थिती बिघडू शकते. चक्करसारखं वाटू शकतं. अशावेळी सर्वात आधी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. यामुळे डोकेदुखी आणि अशक्तपणा दूर होतो. भांगेची नशा दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे झोप. झोप पूर्ण झाल्यास मन शांत होतं आणि प्रसन्न वाटतं. हळूहळू नशा दूर होते.
हेही वाचा : धूलिवंदनावर ग्रहण! गरोदर महिलांनी काळजी घ्यावी, 3 राशींना प्रचंड धोका
तसंच आलं, तुळस, लवंग आणि पुदिना वाटून गरम पाण्यात व्यवस्थित उकळवून प्यायल्यास भांगेची नशा निघून जाते. शिवाय डोकंही शांत होतं. म्हणजेच भांगेच्या नशेमुळे डोकं दुखत असेल, अस्वस्थ वाटत असेल तर त्यावर आराम मिळतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा