त्वचेसाठी, वेगवेगळ्या प्रकारची क्रीम, सीरम, टोनर आणि लोशनचा वापर केला जातो. अनेकदा, बाजारातील क्रिममुळे निरोगी त्वचेचंही नुकसान होतं. यावर उपाय म्हणजे तुम्ही घरीच क्रिम तयार करु शकता. या क्रिममुळे तुमच्या त्वचेवरचे डाग कमी होतील आणि त्वचा चमकदार राहील.
Hair Care : केस गळती रोखण्यासाठी पारंपरिक औषध, खोबरेल तेलाला पर्याय नाही
advertisement
कोरफड जेल नाईट क्रीम - Aloe Vera Gel Night Cream
कोरफड जेल नाईट क्रीम तयार करण्यासाठी एलोवेरा जेल 2 ते 3 चमचे, गुलाबजल 1 ते 2 चमचे, बदामाचं तेल 1 चमचा, लव्हेंडर ऑईल 7-8 अशा साहित्याची गरज आहे. सर्व प्रथम, एका भांड्यात कोरफडीचा गर आणि गुलाब पाणी मिक्स करा. त्यात 1 चमचा बदाम तेल आणि काही थेंब लव्हेंडर तेल चांगलं मिसळून घ्या. तुमचं क्रीम तयार आहे. ते एका छोट्या डबीत काढून ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
मध फेस पॅक - Honey Face Pack
मधाचा फेस पॅक कोरड्या त्वचेच्या प्रकारांसाठी उत्तम आहे. दररोज 1 चमचा मधानं त्वचेवर मसाज करा. त्यानंतरसाधारण 10 मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं त्वचा स्वच्छ करा. यामुळे काही दिवसातच त्वचेमध्ये कोमलता आणि चमक दिसून येईल. सेंद्रिय मध वापरणं तुमच्या त्वचेसाठी अधिक प्रभावी ठरेल.
Pomegranate : आरोग्यासाठी उपयुक्त फळ - डाळिंब, अशक्तपणा होईल दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त
एवोकॅडो फेस पॅक
एवोकॅडो फेस पॅक तयार करण्यासाठी सर्व प्रथम एवोकॅडो कुस्करुन घ्या आणि चेहऱ्यावर लावा. नंतर हळूहळू त्वचेला मसाज करा. पाण्यानं धुण्यापूर्वी किमान 15 मिनिटं हा थर चेहऱ्यावर राहू द्या.
त्वचेचे किती प्रकार आहेत?
कोरडी त्वचा - त्वचेमध्ये आर्द्रतेची कमतरता असते तेव्हा त्वचा कोरडी होते.
तेलकट त्वचा - त्वचेतील ग्रंथी जास्त तेल तयार करतात. यामुळे त्वचा चमकदार दिसते आणि उघडी छिद्र मोठी होतात. तेलकट त्वचेमध्ये ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि मुरुमांच्या समस्या अधिक प्रमाणात आढळतात.
कॉम्बिनेशन स्किन - या त्वचेचा प्रकार असलेल्या लोकांचा चेहरा काही ठिकाणी तेलकट आणि काही भागात कोरडा असतो. अशा त्वचेला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात.
त्वचेवर कोणतंही क्रिम, लोशन लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.