TRENDING:

Constipation : बद्धकोष्ठतेवर हे उपाय नक्की करा, तुम्हाला वाटेल फ्रेश

Last Updated:

पोट सकाळी साफ नसेल, तर रात्री झोपण्यापूर्वी घरगुती उपाय केल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल शिवाय पचनसंस्थाही मजबूत होईल. जीवनशैली निरोगी असेल तर ही समस्या कमी होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बद्धकोष्ठतेमुळे अनेक जण त्रस्त असतात. सकाळी पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर दिवसभर थकवा, जडत्व आणि चिडचीड जाणवते. आहार संतुलित नसणं, पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
News18
News18
advertisement

पण, काही घरगुती उपाय केले तर ही समस्या हळूहळू कमी होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी काही सवयी पाळल्या तर पचनसंस्था सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.

बद्धकोष्ठतेची अनेक कारणं असू शकतात:

अनियमित खाण्याच्या सवयी: फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यानं पचन बिघडतं.

पाण्याची कमतरता: पुरेसे पाणी न प्यायल्यानं मल कठीण होतो.

advertisement

Walnuts : अक्रोडाचे गुणकारी फायदे, मेंदूच्या आरोग्याबरोबरच वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त

ताण आणि चिंता: मानसिक ताणामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.

शारीरिक हालचालींचा अभाव: दिवसभर बसून राहिल्यानं आतडे आळशी होतात.

रात्री झोपण्यापूर्वी घरगुती उपाय

1. कोमट पाणी आणि लिंबू - एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात चिमूटभर मीठ किंवा एक चमचा मध घाला. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्यानं पचनसंस्था सक्रिय होते आणि सकाळी पोट स्वच्छ होतं.

advertisement

2. त्रिफळा चूर्ण - आयुर्वेदात त्रिफळा चूर्ण पचन सुधारण्यासाठी ओळखलं जातं. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक-दोन चमचे त्रिफळा चूर्ण मिसळून प्या. यामुळे आतडं स्वच्छ होतं आणि बद्धकोष्ठतेचं प्रमाण कमी होतं.

3. इसबगोल - एक ग्लास दूध किंवा कोमट पाण्यात एक-दोन चमचे इसबगोल मिसळून प्यायल्यानं बद्धकोष्ठता कमी होते. त्यामुळे आतडी स्वच्छ होतात आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.

advertisement

4. ओवा आणि बडीशेपेचं पाणी - एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप घालून उकळवा. झोपण्यापूर्वी हे पाणी गाळून प्या. यामुळे गॅस आणि अपचन कमी होतं आणि पोट साफ होतं.

Black Berry : आरोग्यासाठी गुणकारी फळ - जांभूळ, त्वचा - हृदयरोगासाठी उपयुक्त

5. कोमट दूध आणि तूप - एक ग्लास कोमट दुधात एक चमचा तूप मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी ते प्या. यामुळे आतड्यांना वंगण मिळतं आणि सकाळी आतड्यांची हालचाल सुलभ होते.

advertisement

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीचे उपाय:

फायबरयुक्त पदार्थ खा: पपई, सफरचंद, पेरू, भेंडी, पालक, गाजर, ओट्स इ.

दररोज तीस मिनिटं चालणं: हलक्या व्यायामामुळे पचन सुधारतं.

पुरेसं पाणी प्या: दिवसभरात किमान आठ -दहा ग्लास पाणी प्या.

ताण कमी करा: योग आणि ध्यानामुळे मानसिक शांती मिळते, ज्यामुळे पचन सुधारेल.

पोट सकाळी साफ नसेल, तर रात्री झोपण्यापूर्वी हे घरगुती उपाय करून पहा. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेलच, शिवाय पचनसंस्थाही मजबूत होईल. जीवनशैली निरोगी असेल तर या समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Constipation : बद्धकोष्ठतेवर हे उपाय नक्की करा, तुम्हाला वाटेल फ्रेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल