वयोमानामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. अशा परिस्थितीत, अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी, घरगुती वस्तूंपासून फेस मास्क बनवून लावता येतो. हे फेस मास्क त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही प्रभावी आहेत.
Bottle Gourd : आरोग्यकारक दुधी भोपळा - त्वचेपासून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
अंड्याचा पांढऱ्या भागापासून बनवा फेस मास्क
advertisement
अंड्याच्या पांढऱ्या भागापासून बनवलेला फेस मास्क त्वचा घट्ट करण्यासाठी प्रभावी आहे. त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि त्वचेच्या मृत पेशी काढण्यासाठी हा मास्क उपयुक्त ठरतो. फेस पॅक बनवण्यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग एक भांड्यात घ्या, त्यात एक चमचा मध मिसळा. हा फेस मास्क 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा.
काकडीचा फेस मास्क
काकडीचे थंड गुणधर्म त्वचेला हायड्रेशन देण्याबरोबरच चेहऱ्याची चमकही वाढवतात. हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला काकडी आणि दही लागेल. फेस मास्क बनवण्यासाठी अर्धी काकडी किसून घ्या त्यात एक चमचा दही मिसळून पेस्ट बनवा आणि 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
बेसनाचा फेस पॅक
2 चमचे बेसनामध्ये गुलाबजल आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर धुवा. हा फेस पॅक त्वचा घट्ट करण्यासाठी प्रभावी आहे.
Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी12 वेगानं वाढण्यासाठी हे उपाय नक्की करा, आरोग्याकडे लक्ष द्या
केळीचा फेस पॅक
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी केळी उपयुक्त आहेत. केळीचा फेस पॅक बनवून लावल्यानं त्वचा घट्ट होते आणि चमकते. सुरकुत्या कमी करण्यासाठी केळीचा फेस मास्क बनवता येतो. फेस मास्क बनवण्यासाठी केळी कुसकरुन त्यात एक चमचा मध घाला, 20 ते 25 मिनिटं हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
पपई फेस मास्क
त्वचा घट्ट करण्याचे सर्व गुणधर्म पपईत आहेत. पपईमुळे त्वचेला चमक येते. पपईचे 2 ते 3 तुकडे घेऊन बारीक करा. त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावल्यानं त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. या फेस मास्कमुळे टॅनिंगची समस्याही कमी होते.