Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी12 वेगानं वाढण्यासाठी हे उपाय नक्की करा, आरोग्याकडे लक्ष द्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण कमी असेल तर नसा दुखतात, आणि थकवा येतो. व्हिटॅमिन बी12 ची पातळी झपाट्यानं वाढण्यासाठी दही खाणं उपयुक्त आहे.
मुंबई : व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. मज्जासंस्था आणि रक्त पेशी निरोगी ठेवण्यासाठी याची मदत होते. त्याची कमतरता थकवा, मज्जातंतू वेदना आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या जाणवू शकतात.
व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण कमी असेल तर नसा दुखतात आणि थकवा येतो. व्हिटॅमिन बी12 ची पातळी झपाट्यानं वाढण्यासाठी दही खाणं उपयुक्त आहे. मूड अचानक बदलणं, थकवा जाणवणं, जास्त झोप लागणं, सुन्नपणा जाणवणं, मुंग्या येणं, ही लक्षणं जाणवत असतील तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं
तीव्र थकवा आणि अशक्तपणा
नसांमध्ये वेदना आणि मुंग्या येणं
चक्कर येणं
लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं
त्वचेचा पिवळसरपणा किंवा रंग उतरणं
हृदयाचे ठोके जलद होणं
शरीरात ऊर्जेचा अभाव जाणवणं
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची कारणं
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं मुख्य कारण म्हणजे त्याची आहारातील या घटकाची कमतरता. ही समस्या शाकाहारींमध्ये अधिक दिसून येते. कारण हे जीवनसत्व मुख्यत: मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतं. याशिवाय वृद्धत्व, पचनसंस्थेतील समस्या आणि काही औषधांच्या सेवनामुळेदेखील ही समस्या जाणवू शकते.
दही आणि व्हिटॅमिन बी 12
advertisement
दही व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. बी 12 ची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच पचनसंस्था सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो. दह्यामधले बॅक्टेरिया शरीरात हे जीवनसत्व शोषण्यास मदत करतात.
काही अतिरिक्त गोष्टी घालून दही खाल्ल्यास त्याचा परिणाम आणखी चांगला होऊ शकतो.
जवस : जवस हा ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत आहे आणि जवस दह्यामध्ये घातल्यानं व्हिटॅमिन बी 12 शोषण्यास मदत होते.
advertisement
मीठ आणि भाजलेलं जिरं: चव वाढवण्यासाठी दह्यामध्ये थोडं मीठ आणि भाजलेले जिरे घालून खावं. हे पचनासाठी देखील फायदेशीर आहे.
मेथी पावडर: मेथी पावडर घातल्यानं दही अधिक पौष्टिक बनतं आणि मज्जासंस्था देखील सुधारते.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कशी दूर करावी?
advertisement
तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि मांस यांचा समावेश करा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट्स घ्या.
आपल्या नियमित आहारात दह्यासारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या आणि दही तुमच्या आहारात असू द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 11, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी12 वेगानं वाढण्यासाठी हे उपाय नक्की करा, आरोग्याकडे लक्ष द्या