चेहऱ्यासाठी घरगुती आणि सहज मिळणाऱ्या साहित्यातूनच मॉइश्चरायझर बनवता येतं. कोरफडीचा गर, बदामाचं तेल आणि गुलाबपाणी वापरुन घरीच मॉइश्चरायझर तयार करता येईल.
Heart : हे पदार्थ खा, हृदयाचं आरोग्य जपा, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही उपयुक्त
कोरफड आणि बदाम तेल मॉइश्चरायझर -
कोरफड आणि बदाम तेलाचं हे मिश्रण हलक्या स्वरुपाचं आहे. घरी मॉइश्चरायझर बनवण्यासाठी, अर्धा कप कोरफड जेल, दोन टेबलस्पून जोजोबा किंवा बदाम तेल, 5-6 थेंब लव्हेंडर इसेन्शियल तेल एका मोठ्या भांड्यात एकत्र मिसळा. वापरा आणि हवाबंद डब्यात ठेवा.
advertisement
Fatty Liver : यकृताच्या तब्येतीसाठी ओळखा आहाराचं महत्त्व, जीवनशैलीत करा आवश्यक बदल
गुलाब पाणी आणि कोरफडीचं मॉइश्चरायझर -
गुलाब हे बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी आहे. ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगलं आहे. बदामाचं तेल हलकं असतं आणि यामुळे छिद्र बंद होत नाहीत. हे मॉइश्चरायझर घरी बनवण्यासाठी, पाव कप बदाम तेल, 1/8 कप मेण, 1/4 कप कोरफड जेल डबल बॉयलरमध्ये, बदाम तेल आणि मेण एकत्र करा आणि पूर्णपणे वितळू द्या. तेल आणि मेणाचं मिश्रण, कोरफड जेल, गुलाब पाणी आणि तेल मिसळा आणि मॉइश्चरायझर म्हणून वापरा.