प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे, त्वचेची चमक हरवते आणि मृत त्वचेच्या पेशी चेहऱ्यावर जमा होतात. या मृत पेशी काढून टाकण्यासाठी घरच्या घरी स्क्रब तयार करून चेहऱ्याला लावता येतो. हा स्क्रब चेहऱ्यावर वर्तुळाकार पद्धतीनं एक ते दीड मिनिटं घासावा आणि त्यानंतर चेहरा धुऊन स्वच्छ करावा. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि चेहऱ्यावर चमक येते.
advertisement
कॉफी आणि मध स्क्रब - कॉफी आणि मध मिसळून स्क्रब तयार केला जाऊ शकतो. स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा ग्राउंड कॉफीमध्ये एक चमचा मध चांगला मिसळा. हा स्क्रब चेहऱ्यावर घासून नंतर धुवा. चेहऱ्यावर साचलेल्या डेड स्किन सेल्स आणि मळ काढून टाकली जाते आणि चेहरा चमकदार दिसतो. आठवड्यातून एकदा या स्क्रबनं चेहरा स्वच्छ करता येतो.
Suryanamaskar : प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी सोपा उपाय, सूर्यनमस्कार घाला, आजारांना दूर ठेवा
साखरेचा स्क्रब - साखरेचा स्क्रब घरी बनवणं खूप सोपं आहे. हा स्क्रब बनवण्यासाठी साखरेत खोबरेल तेल किंवा बदाम तेल मिसळा. अर्धा चमचा तेल एक चमचे साखरेत मिसळता येतं. ते चेहऱ्यावर हलक्या हातानं चोळा आणि नंतर धुवा.
कॉफी आणि खोबरेल तेल - कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून स्क्रब बनवता येईल. एक चमचा कॉफीमध्ये गरजेनुसार खोबरेल तेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. थोड्या वेळानं कोमट पाण्यानं धुवा.
Dry Eye Syndrome: ड्राय आय सिंड्रोम, डोळे कोरडे होत असतील तर वेळीच लक्ष द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या
ओट्स आणि दही - हा स्क्रब बनवण्यासाठी ओट्स बारीक करून त्यात थोडं दही मिसळा. चेहऱ्यावर चोळल्यानं त्वचेवरचे डाग जायला मदत होते. या स्क्रबमुळे त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते.
बेसन आणि दही - एक चमचा बेसनामध्ये थोडं दही मिसळून पेस्ट बनवा. त्यात थोडी हळदही टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर घासल्यानं त्वचेच्या मृत पेशी निघतातच शिवाय सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर होणाऱ्या टॅनिंगपासूनही सुटका होते.
समुद्री मीठ आणि बदाम तेल - हा फेस पॅक समुद्री मीठात बदामाचे तेल मिसळून तयार केला जातो. या स्क्रबमुळे चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचेवर साचलेला मळ निघतो.