स्वच्छता आहे का पुरेशी?
ऑनलाइन किंवा सुपर मार्केटमधून खरेदी केलेली फळे आणि भाज्या अनेक हातांमधून प्रवास करतात. त्यामुळे त्यावर जंतू, कीटकनाशके आणि रसायनांचे अंश असण्याची शक्यता असते. अशा पदार्थांचे सेवन केल्यास अन्न विषबाधा, पोटाचे आजार आणि इतर संसर्गजन्य रोग होऊ शकतात, असं डॉ. पाटील सांगतात.
Mango Rate: फळांचा राजा बाजारात दाखल, पाडव्याच्या मुहूर्तावर किती मिळतोय दर?
advertisement
काय काळजी घ्यावी?
1) स्वच्छ धुवा: भाज्या आणि फळे साध्या पाण्याने चांगली स्वच्छ धुवावीत.
2) भिजवून ठेवा: पाण्यात व्हिनेगर किंवा मीठ टाकून 15-20 मिनिटे भिजवल्यास कीटकनाशके कमी होतात.
3) लेबल वाचा: रेडी टू इट पदार्थ खरेदी करताना उत्पादन आणि एक्सपायरी डेट तपासणे अत्यावश्यक आहे.
आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
फळे आणि भाज्या नेहमी स्थानिक उत्पादकांकडून ताजी खरेदी करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र, सुपर मार्केटमधून खरेदी करताना स्वच्छता आणि साठवणीच्या पद्धतींवर लक्ष द्यावे. शक्य असल्यास ऑरगॅनिक उत्पादनांना प्राधान्य द्यावे.
ऑनलाईन किंवा सुपर मार्केटमधून फळभाज्या खरेदी करणे सोयीचे असले तरी योग्य स्वच्छता आणि काळजीशिवाय त्याचे सेवन टाळावे. स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेऊनच या गोष्टींचा आनंद घ्या, असंही डॉ. पाटील सांगतात.