मासांहार बंद करावा, नियमित व्यायाम करावा
सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील यूरोलॉजी विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अमरेन्द्र पाठक यांनी न्यूज18 ला सांगितले की, यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी लोकांनी प्युरीनयुक्त पदार्थ टाळावेत. विशेषतः मांसाहार बंद करावा जेणेकरून शरीरात यूरिक ॲसिडचे उत्पादन वाढू नये. याशिवाय लोकांनी नियमित शारीरिक हालचाल करावी आणि वेळेवर झोपणे आणि उठणे करावे. यूरिक ॲसिडची वेळोवेळी तपासणीही करावी, जेणेकरून त्यावर योग्य लक्ष ठेवता येईल.
advertisement
भरपूर पाणी प्या, फळं अन् भाज्या खा
डॉ. अमरेन्द्र पाठक यांच्या मते, यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी शरीरातील यूरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मदत करते आणि किडनीचे कार्यही सुधारते. यूरिक ॲसिडच्या रुग्णांना दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी किडनीमधून विषारी पदार्थ आणि यूरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मदत करते. सफरचंद, गाजर, टोमॅटो आणि काकडी यांसारखी फळे आणि भाज्या यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये फायबर, पाणी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे यूरिक ॲसिड नियंत्रित करतात.
वाईन आणि बिअरसारखी मादक पेये टाळा अन् दही खा
तज्ज्ञांच्या मते, यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी वाईन आणि बिअरसारखी मादक पेये टाळावी. या गोष्टी यूरिक ॲसिडची पातळी वाढवतात. जर तुमचे यूरिक ॲसिड जास्त असेल, तर या गोष्टींचे सेवन शक्य तितके लवकर बंद करा. दही आणि इतर प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे यूरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मानसिक ताण यूरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतो. हे टाळण्यासाठी योगा, प्राणायाम आणि ध्यान करा. यामुळे ताण कमी होईल आणि यूरिक ॲसिडपासूनही आराम मिळेल.
हे ही वाचा : Winter Care Tips: हिवाळ्यात सारखा होतोय सर्दी खोकल्याचा त्रास, करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
हे ही वाचा : पुण्यात नवीन विषाणूचा शिरकाव, 22 संशयित आढळले, काय आहे नवीन आजार?