Winter Care Tips: हिवाळ्यात सारखा होतोय सर्दी खोकल्याचा त्रास, करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Last Updated:

Home remedies for Cough & Cold problem in Winter: हिवाळ्यात बदललेलं वातावरण आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होणं ही एक सामान्य बाब आहे. मात्र जेव्हा हा खोकला दीर्घकाळ टिकतो तेव्हा तो त्रासदायक ठरू शकतो. जाणून घेऊयात त्या प्रभावी घरगुती उपायांबद्दल जे हिवाळ्यात सर्दी- खोकल्याच्या त्रासावर गुणकारी ठरू शकतात.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात सारखा होतोय सर्दी खोकल्याचा त्रास, करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात सारखा होतोय सर्दी खोकल्याचा त्रास, करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
मुंबई : हिवाळ्यात बदललेलं वातावरण आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होणं ही एक सामान्य बाब आहे. मात्र जेव्हा हा खोकला दीर्घकाळ टिकतो तेव्हा तो त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी खोकल्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करणं फायद्याचं ठरतं. औषधांनी सर्दी- खोकला हा बरा जरी होऊ शकला तरीही या औषधांचे अनेक दुष्पपरिणाम देखील आहेत. त्यामुळे औषधांपेक्षा सर्दी-खोकल्यावर आजीबाईच्या बटव्यातली म्हणजेच आयुर्वेदिक औषधं प्रभावी ठरतात.

जाणून घेऊयात त्या प्रभावी घरगुती उपायांबद्दल जी हिवाळ्यात सर्दी- खोकल्याच्या त्रासावर गुणकारी ठरू शकतात.

मध: मधात असलेल्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे खोकल्यापासून आराम मिळतो. कोमट पाण्यात किंवा आल्याच्या चहामध्ये 1 चमचा मध मिसळून दिवसातून 2 ते 3  वेळा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. याशिवाय गरम पाण्यात मध टाकून प्यायल्याने कफ वितळून छाती मोकळी व्हायला मदत होते.
advertisement
आलं: मधाप्रमाणे आल्यातही अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे विषाणूंचा त्रास कमी होऊन घशाची जळजळ कमी होते आणि खोकला बरा होण्यास मदत होते. तुम्ही कच्च्या आल्याचे तुकडे चावून खाऊ शकता. चहा किंवा मधाच्या पाण्यात आल्याचा तुकडा टाकून ते प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
ज्येष्ठमध: खोकला किंवा घसा खवखवण्याच्या त्रासावर ज्येष्ठमध हे गुणकारी आहे. ज्येष्ठमध खाल्ल्याने कफ वितळून खोकला कमी व्हायला मदत होते. मध आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून  दिवसातून 2 वेळा खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
advertisement
मध आणि लवंग: हिवाळ्यात तुम्हाला सर्दी किंवा खोकला किंवा दोन्हींचा त्रास होत असेल तर लवंग आणि मधाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. लवंग बारीक करून मधात मिसळून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा लवंग मधाचं सेवन करू शकता. याशिवाय खोकल्याची उबळ रोखण्यासाठी तुम्ही लवंग जीभेखाली ठेऊ शकता.
advertisement
दूध आणि हळद: हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा सक्रिय घटक असतो ज्यामुळे हळदीची ही नैसर्गिंक अँटिबायोटिक ठरते. खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दुधात एक चमचा हळद टाकून ते दूध पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुमच्या शरीरातलं संक्रमण कमी होईल.
advertisement
कोमट पाण्याच्या गुळण्या: सर्दी खोकल्यासोबतच तुमचा घसा खवखवत असेल, घसा बसला असेल किंवा गिळायला त्रास होत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणं फायदेशीर आहे. जर तुमच्या घरी बिटाडिन असेल तर तुम्ही कोमट पाण्यात 1 झाकण बेटाडिन टाकून तुम्ही गुळण्या करू शकता. यामुळे तुम्हाला अवघ्या काही वेळातच फरक जाणवेल.
advertisement
वाफ घेणं : गरम पाण्याच्या गुळण्यांप्रमाणेच वाफ घेतल्याने सर्दी -खोकल्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. वाफ घेतल्याने छातीला कफ वितळून श्वास घेण्यातली अडचण दूर होते. निलगिरीचं तेल गरम पाण्याची वाफ घेतल्याने अधिक फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Care Tips: हिवाळ्यात सारखा होतोय सर्दी खोकल्याचा त्रास, करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement