Anemia Causes: सावधान! ‘या’ कारणांमुळे फोफावतोय ॲनेमिया, आत्ताच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम

Last Updated:

Anemia symptoms & treatment in Marathi: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा ॲनेमियाचा सामना करावा लागतो.

प्रतिकात्मक फोटो : सावधान! ‘या’ कारणांमुळे फोफावतोय ॲनेमिया, आत्ताच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम
प्रतिकात्मक फोटो : सावधान! ‘या’ कारणांमुळे फोफावतोय ॲनेमिया, आत्ताच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना विविध प्रकारच्या आजारांचा, विकारांचा सामना करावा लागतोय. डायबिटीस, हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर हे आपल्या ओळखीचे किंबहुना ज्ञात असणारे आजार. ज्यांना लाईफस्टाईल डिसीज म्हणूनही ओळखलं जातं. असाच एक आजार आहे तो म्हणजे ॲनेमिया. शरीरात रक्ताच्या कमतरेमुळे हा आजार होतो. या आजाराची लक्षणं फारशी दिसून येत नाही किंवा आलीत तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यामुळे अनेकदा या आजारामुळे शरीराच्या अन्य महत्त्वांच्या अवयवांवर परिणाम होऊ गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयाच ॲनेमियाची लक्षणं आणि त्यावर उपाय काय आहेत ते.

ॲनेमिया फोफावतोय.

Anemia symptoms & treatment in Marathi: सावधान! ‘या’ कारणांमुळे फोफावतोय ॲनेमिया, आत्ताच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा ॲनेमियाचा सामना करावा लागतो. या अहवालात असंही म्हटलंय की, अनेक भारतीयांना ॲनिमियाचा त्रास होऊ लागलाय. बहुतांश लोक ही ॲनिमियाने त्रस्त आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे ॲनिमिया. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल किंवा हा अनुभव आला असेल. एखाद्या आजारपणात जेव्हा आपण रक्त तपासतो तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता आढळून येते. डॉक्टर सहजपणे आपल्याला सांगतात रक्त कमी आहे, बीट किंवा गाजर ज्यूस प्या. आपण त्यांचं बोलणं फारसं मनावर घेत नाही. महिलांमध्ये  मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तास्रावामुळे रक्ताची कमतरता असते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्त कमी असल्याने काही बिघडत नाही असा समज आपण करून घेतो आणि मग सुरू होतो ॲनिमिया आणि अन्य गंभीर आजारांचा त्रास. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने 4613 लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. ज्यात लहान मुलांचाही समावेश होता. 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये रक्ताची कमतरता ही पुरुषांपेक्षा खूपच जास्त असल्याची आढळून आलीय.
advertisement

रक्ताच्या कमतरतेचं खरं कारण काय ?

अहवालानुसार, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हे ॲनिमियाचं मुख्य कारण मानलं जातं. आता प्रश्न हा उपस्थित होतो की, आपल्यापैकी अनेकांना पालेभाज्या खायची सवय आहे. पालेभाज्या हा व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्त्रोत आहे. मग तरीही व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कशी भासू शकते ? यावर क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी छान उत्तर दिलंय. त्या म्हणतात की, पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असलं तरीही स्वयंपाक करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे भाज्यांमधून व्हिटॅमिन बी 12 नष्टं होतं. व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. त्यामुळे भाज्या जास्त काळ पाण्यात ठेवल्या किंवा त्या जास्त काळ शिजवल्या तर व्हिटॅमिन बी 12 नष्ट होतं. याशिवाय आजकाल जंकफूडमुळे हिरव्या पालेभाज्या खाण्याचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे एकूणच व्हिटॅमिन बी12 ची कमतरता निर्माण होऊन ॲनेमियाचा त्रास वाढू लागलाय.
advertisement

साध्या लक्षणांकडे लगेच लक्ष द्या

Anemia symptoms & treatment in Marathi: सावधान! ‘या’ कारणांमुळे फोफावतोय ॲनेमिया, आत्ताच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम
advertisement
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर पर्यायाने रक्ताची कमतरता निर्माण होऊन तुम्हाला सततचा थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशा विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय उलट्या, जुलाब, अचानक वजन कमी होणं असे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य त्या औषधोपचाराने व्हिटमिन बी 12 कमतरता भरून काढून ॲनेमियाच्या त्रासाला दूर ठेवा. जेणेकरून तुम्ही फिट राहू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Anemia Causes: सावधान! ‘या’ कारणांमुळे फोफावतोय ॲनेमिया, आत्ताच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement