Wight Loss Tips: वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट

Last Updated:

Weight Loss Tips in Marathi: वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर मानसिक शांतताही आणि सकस, पोषक आहाराची गरज असते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्ही तणावात असाल, तुम्ही जंकफूड, हाय कॅलरी फूड खाणार असाल तर तुमचं वजन कमी होण्यात अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे.

प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
मुंबई : वाढतं वजन ही सध्या अनेकांची डोकेदुखी झालीये. वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक प्रयत्न करतात. काहींना  त्यात यश येतं तर काहींना अपयश. वजन कमी करण्याची इच्छा अनेकांनी असते मात्र कधी त्या इच्छेला मूर्त स्वरूप मिळत नाही तर कधी त्या इच्छेकडे गांभीर्यांना पाहिलं जात नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक जण जीममध्ये जाऊन वर्क आऊट करतात. काही जण तासन्‌तास चालतात. काही जण फ्रुट डाएट करतात तर काही जण ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्री कॉफी पितात. मात्र परिणाम काही दिसून येत नाही. कारण वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर मानसिक शांतताही आणि  सकस, पोषक आहाराची गरज असते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्ही तणावात असाल, तुम्ही जंकफूड, हाय कॅलरी फूड खाणार असाल तर तुमचं वजन कमी होण्यात अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर या 10 पदार्थांपासून तुम्हाला 4 हात दूर रहावं लागणार आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या उदीष्टापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत ते.

1) गोड पदार्थ : तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला गोड पदार्थांपासून लांब राहावं लागेल. कारण गोड पदार्थ हे तुमच्या वजन कमी करण्यातल्या प्रवासातला अडथळाच नाही तर तुमच्या आरोग्याचे शत्रू ठरू शकतात. गोड पदार्थात असलेल्या शर्करेमुळे कॅलरीज आणि वजन वाढण्याची भीती असते. त्यामुळे नाश्तात गोड पदार्थांऐवजी भरड धान्य, ओट्स यांचा समावेश करा.
advertisement
10 Foods to Avoid during Wight Loss: वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
2) सरबत, कोल्ड ड्रिंक्स : कोणत्याही प्रकारचे ड्रिंक्स मग ते कोल्ड ड्रिंक्स, सरबत, एनर्जी ड्रिंक्स, असो की झीरो कॅलरी ड्रिंक्स. असे कार्बोनेटेड ड्रिंक्स प्यायल्याने तुमचं वजन कमी होण्याऐवजी ते वाढेल. याशिवाय असे ड्रिंक्स विविध आजारांना निमंत्रण देतात.
advertisement
3) फ्लेवर्ड ताक: ताक हे पचनासाठी चांगलं असलं असलं तरीही बाजारात टेट्रा पॅक मध्ये मिळणारं, फ्लेवर्ड ताक पिणं टाळा. कारण यात साखर आणि ते जास्त काळ टिकण्यासाठी त्या रसायनं (प्रिझव्हेटिव्हज्) घातली असल्याने ते तुमच्या आरोग्साठी धोक्याचं ठरू शकतं.
4) प्रोसेस्ड चीज : चीज, बटर, मेयोनिज अशा पदार्थांमध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं.मर्यादित स्वरूपातही असे पदार्थ खाणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हे पदार्थ टाळावेच लागतील.
advertisement
10 Foods to Avoid during Wight Loss: वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
5) क्रिमी सलाड : सलाड हे आरोग्यासाठी फायद्याचं जरी असलं तरीही त्यावर चीज, मेयोनिज टाकून खाणं धोक्याचं ठरू शकतं. अशा डिझायनर सलाडमुळे तुमच्या शरीरात सोडियम आणि फॅट्सचं प्रमाण वाढून त्याचा थेट धोका तुमच्या यकृत आणि हृदयाला होऊ शकतो.
advertisement
6) इन्स्टंट नूडल्स: चायनीज नूडल्स किंवा मैद्यापासून बनवलेली कोणतीही गोष्ट वजन कमी करण्याऐवजी ते वाढवण्यात मदत करतात. म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नुडल्स आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळा.
10 Foods to Avoid during Wight Loss: वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
advertisement
7) गोड दूध / लस्सी: बाजारात मिळणाऱ्या दुधात किंवा लस्सीमध्ये साखर असते. त्यामुळे या गोड पदार्थामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढण्याची भीती असते. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
advertisement
8) बुफेमधलं जेवण: जेव्हा तुम्ही बुफेमध्ये जेवता, तेव्हा तुम्ही अजाणतेपणे खूप भरपूर खाता. याशिवाय अनेकदा तुम्ही उभं राहून खाता, त्यामुळे पचानाच्या समस्या निर्माण होऊन शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढू शकतं.
10 Foods to Avoid during Wight Loss: वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
9) चिकन बिर्याणी: चिकन खाल्ल्याने वजन कमी होते असे म्हणतात पण बिर्याणी खाल्ल्याने वजन वाढतं. याचं कारण म्हणजे बिर्याणी बनवताना वापरलं जाणारं तेल आणि तूप. भलेही हे तूप शुद्ध असलं तरीही तेल, तूप एकत्र खाल्ल्याने शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढतं.
10) हाय कॅलरी फूडस:तुम्ही वजन कमी करता याचा अर्थ तुमच्या शरीरात असलेल्या कॅलरीज बर्न करता आहात. अशा स्थितीत जर तुम्ही हाय कॅलरी फूडस किंवा अन्न खात असाल तर पुन्हा त्या कॅलरीज तुमच्या शरीरात नव्याने तयार होणार आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रोटिन्स आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घेऊन, कॅलरीयुक्त आहार टाळा.
आधी सांगितल्या प्रमाणे दर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त व्यायाम किंवा आहारच नाही तर पुरेशी झोपही आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही ताणतणाव विरहीत असणं जास्त गरजेचं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Wight Loss Tips: वजन कमी करायचं आहे? मग टाळा ‘हे’ 10 पदार्थ, अन्यथा सगळी मेहनत जाईल फुकट
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement