Uric Acid - युरिक ॲसिड वाढलं तर काय करावं ? आहारात कसे बदल कराल ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
युरिक ॲसिड वाढलं तर शरीरात खूप वेदना जाणवतात..अशावेळी औषधं घेणं, आहार - जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे.
मुंबई : शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलंय असं वाटत असेल तर आहारात बदल करा आणि जीवनशैलीतल्या काही गोष्टींपासून दूर राहा. आपल्या शरीरात यूरिक ऍसिड वाढतं तेव्हा सांधेदुखीसह अनेक प्रकारच्या समस्या वाढू लागतात. काही गोष्टींचं सेवन केल्यानं यापासून आराम मिळू शकतो.
आपल्या शरीरात यूरिक ॲसिड तयार होणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि जेव्हा ते तयार होतं तेव्हा मूत्रपिंड ते फिल्टर करतं आणि मूत्राच्या रूपात शरीरातून बाहेर टाकतं. परंतु अनेक वेळा तसं होत नाही आणि त्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी ते हळूहळू सांध्यांमध्ये जमा होऊ लागतं, त्यामुळे तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. या समस्येमुळे वेदना इतक्या वाढतात की काहींना नीट चालताही येत नाही. अशा परिस्थितीत, यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी, आपण आपल्या आहारात काही गोष्टी समाविष्ट करू शकता ज्यामुळे ते नियंत्रित होऊ शकतं.
advertisement
युरिक ॲसिड वाढल्यावर काय होतं ?
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात यूरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं तर त्याला किडनीशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे किडनी नीट फिल्टर करू शकत नाही. याशिवाय सांधेदुखीची म्हणजेच संधिवाताची समस्यादेखील असू शकते.
advertisement
युरिक ॲसिड वाढण्याची कारणं -
ज्यांची जीवनशैली खराब आहे त्यांना यूरिक ॲसिड वाढण्याची समस्या जास्त जाणवते. याशिवाय जे लोक पुरेसं पाणी पीत नाहीत त्यांनाही हा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर सावधान, तुम्हालाही हा त्रास होऊ शकतो. जास्त मांसाहार आणि तणावामुळेही शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं.
advertisement
1. फळं आणि भाज्या -
यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी, आपण अधिक फळं आणि भाज्या खाव्यात. त्यामध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे किडनी निरोगी राहते आणि किडनीचं कार्य योग्य प्रकारे सुरू राहतं आणि ॲसिड जमा होण्यापासून रोखून ते फिल्टर करू शकतात.
२. भरपूर पाणी प्या -
भरपूर पाणी प्या, यामुळे तुमची किडनी निरोगी राहते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यानं किडनी व्यवस्थित काम करते आणि युरिक ॲसिड काढून टाकते.
advertisement
3. चेरी खा -
जर तुम्हाला युरिक ॲसिडची समस्या असेल तर चेरी खा. यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे यूरिक ॲसिड कमी करण्याचं काम करतात. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.
४. या धान्यांचं सेवन करा -
जर तुम्ही तुमच्या आहारात ओट्स, बार्ली आणि ब्राउन राईस सारख्या गोष्टींचा समावेश केला तर ते तुमच्या शरीरातून यूरिक ॲसिड काढून टाकण्यास खूप मदत करू शकतात. कारण या धान्यांमध्ये पुरेशा प्रमाणात
advertisement
फायबर आढळतं.
5. ग्रीन टी -
शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी ग्रीन टीचं सेवन करता येईल. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेलं यूरिक ॲसिड कमी करता येतं.
आहारात काही पदार्थ टाळणं गरजेचं -
advertisement
1. लाल मांस आणि गोमांस -
जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही लाल मांस - गोमांस, डुकराचं मांस खाणं
टाळावं कारण त्यात प्युरीनचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
2. समुद्री पदार्थ खाऊ नका -
तुम्ही मासे, कोळंबी आणि खेकडे यासारखे समुद्री खाद्यपदार्थ म्हणजे सी फूड खाणं देखील टाळावं. या व्यतिरिक्त तुम्ही अल्कोहोलचं सेवन करू नका कारण यामुळे देखील युरिक ॲसिड वाढतं.
3. ज्यूस आणि शीतपेय टाळणं -
केवळ अल्कोहोलच नाही तर गोड पेयं देखील - जसं की, सोडा, रस आणि इतर गोड पेयांचं सेवन करू नका. कारण त्यात फ्रक्टोज असतं. याशिवाय साखरेचं सेवन केल्यानं युरिक ॲसिडही वाढतं. याशिवाय तुम्ही तुमचं वजन आणि तणाव कमी करण्याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
४. साखरेपासून दूर राहा-
जर तुम्ही साखरेचं सेवन करत असाल तर आजपासून साखर दूर करा कारण साखरेचं सेवन केल्यानं तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं.
5. दारूपासून लांब राहा -
दारु पिणाऱ्यांमध्येही यूरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं दिसतं. त्यामुळे अशा लोकांनी दारुपासून दूर राहावं.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1. नियमित व्यायाम -
जर तुम्ही युरिक ॲसिडच्या समस्येनं त्रस्त असाल तर तुम्ही नियमित व्यायाम करा. यामुळे तुमची चयापचय क्रिया
चांगली राहते आणि शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
2. वजन नियंत्रणात ठेवा -
ज्यांच्या शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे त्यांनी आपलं वाढतं वजन कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
३. औषधं घ्या -
शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं असेल आणि ते नियंत्रित करणं कठीण असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा -
तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, ज्यांना तणाव असताे, त्यांच्यामध्येही यूरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2024 5:26 PM IST











