तुमची त्वचाही कोमेजलेली दिसत असेल तर जाणून घेऊया टोमॅटोनं फेशियल कसं करता येईल. हे फेशियल करणं सोपं आणि खूप प्रभावी आहे.
1 - आधी त्वचा स्वच्छ करुन घ्या.
सर्व प्रथम त्वचा टोमॅटोनं क्लीन्झ करुन घ्या. त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटो बारीक करुन त्यात दूध मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून घ्या आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा किंवा हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं त्वचेवर ठेवू शकता.
advertisement
Vitamin A : 'व्हिटॅमिन ए' साठी हे पदार्थ नक्की खा, दूध, डोळे, त्वचा, हाडांसाठी गरजेचं
2 - टोमॅटो स्क्रब बनवा.
यातली पुढची पायरी म्हणजे टोमॅटो स्क्रबनं त्वचा एक्सफोलिएट करणं. टोमॅटो स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा टोमॅटो प्युरी घ्या आणि त्यात २ चमचे साखर आणि थोडा मध मिसळा. हा स्क्रब चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं चोळा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. या स्क्रबनं, चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि बंद झालेली छिद्र उघडली जातात, ज्यामुळे त्वचा त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकते.
3 - चेहऱ्यावर वाफ घ्या.
एका टबमध्ये गरम पाणी घ्या. त्याची वाफ चेहऱ्यावर घ्या आणि आपलं डोकं टॉवेलनं झाकून घ्या. यामुळे त्वचा डिटॉक्स होते. थोडा वेळा चेहऱ्यावर वाफ घ्या.
Eye Care : डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको, योग्य आहार, डोळ्यांचे व्यायाम नक्की करा
4 - टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा.
एक चमचा टोमॅटो प्युरीमध्ये एक चमचा चंदन पावडर मिसळा. त्यात थोडं गुलाबपाणी टाका. हा फेस पॅक 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. कोणत्याही फेशियलच्या आधी पॅच टेस्ट करतात, ती याही वेळी करुन मगच टॉमेटो फेशियल करा.