Eye Care : डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको, योग्य आहार, डोळ्यांचे व्यायाम नक्की करा

Last Updated:

दृष्टी चांगली राखण्यासाठी, डोळ्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची दृष्टी पूर्णपणे कमी झाली असेल योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. 

News18
News18
मुंबई : आपला वावर ज्यामुळे सहज होतो, ते म्हणजे आपली दृष्टी. दृष्टी चांगली राखण्यासाठी, डोळ्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची दृष्टी पूर्णपणे कमी झाली असेल योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. हे व्यायाम रोज केल्यानं तुमची दृष्टी चांगली राहील.
सध्या कॉम्प्युटरवरच्या कामामुळे, त्याचा परिणाम डोळ्यांवर होऊ लागतो. कॉम्प्युटर आणि मोबाईल  अति वापरल्यामुळे डोळे कमकुवत होऊ लागतात आणि मज्जातंतूंवर परिणाम होऊ लागतो. याशिवाय डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. डोळे दुखणं, कमी दिसणं, चष्म्याचा नंबर वाढणं यासारख्या समस्या जाणवू शकतात. डोळ्यांचा चष्मा काढण्यासाठी आणि विकार कमी करण्यासाठी काही उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
advertisement
हे उपाय करुन पाहा -
त्रिफळा 
त्रिफळा आणा, त्रिफळा बारीक करुन त्याची पावडर बनवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या आणि त्यात मध किंवा देशी तूप घालून चांगलं मिसळा. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चाटावं. त्रिफळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यात अनेक पोषक घटक असतात.
advertisement
डोळे पाण्यानं स्वच्छ धुवा
डोळ्याभोवती साचलेली घाण सहज साफ करता यावी म्हणून डोळे पाण्यानं धुणंही महत्त्वाचं आहे. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी डोळे थंड पाण्यानं धुवावेत. लॅपटॉप किंवा फोनवर खूप काम करायचं असेल तर, तुम्ही दिवसभरात ब्रेक घेता तेव्हा डोळे धुवू शकता. पाण्यामुळे डोळ्यांना थोडा आराम मिळतो.
हिरव्या भाज्या खा
हिरव्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. जीवनसत्त्वांपासून ते अँटिऑक्सिडंटपर्यंत अनेक गोष्टी आहेत. ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही पालक, मेथी भरपूर खाऊ शकता. या उपायांचं पालन व्यवस्थित केलं तर तुम्हाला परिणाम दिसून येतील.
advertisement
डोळ्यांचा व्यायाम करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. डॉक्टरांकडून डोळ्यांचे व्यायाम शिकून घ्या. यामुळे डोळ्यांना मोठा आराम मिळतो.
advertisement
पुरेशी झोप घ्या
डोळे निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही सतत काम करत राहिलात तर डोळे थकायला लागतात आणि कमजोर देखील होतात. या कारणामुळे, झोपेबद्दल अजिबात तडजोड करू नका. पूर्ण 8 तासांची झोप घ्या.
आईस पॅकचा वापर करा
डोळ्यांना काही दुखापत झाली असेल किंवा तुमचे डोळे जळजळत असतील तर दिवसातून एकदा 15-20 मिनिटांसाठी बर्फाचा पॅक लावा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांतील जळजळही बरी होऊन आरामही मिळतो.
advertisement
डोळ्यांची नियमित तपासणी करा
दर तीन महिन्यांनी डोळे तपासत राहा. तुम्ही करत असलेल्या उपायांचा तुमच्या डोळ्यांवर किती परिणाम होत आहे याविषयी तुम्हाला कळू शकेल.
चष्मा नियमितपणे वापरा
अनेकांना डोळ्यांच्या समस्या असतात पण चष्मा नियमित लावत नाहीत. असं केल्यामुळे डोळ्यांवरचा ताण वाढू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Eye Care : डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको, योग्य आहार, डोळ्यांचे व्यायाम नक्की करा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement