Vitamin A : 'व्हिटॅमिन ए' साठी हे पदार्थ नक्की खा, दूध, डोळे, त्वचा, हाडांसाठी गरजेचं

Last Updated:

आपलं शरीर व्यवस्थित राहावं यासाठी योग्य आहाराबरोबर अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ए आपल्या शरीरातल्या महत्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. दृष्टी, त्वचा, हाडं, यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. दूध, अंडी, गाजर यामधून पुरेसं व्हिटॅमिन ए मिळू शकतं. 

News18
News18
मुंंबई : आपलं शरीर व्यवस्थित राहावं यासाठी अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांची आवश्यकता असते. आपल्याला अन्नातून हे सर्व घटक मिळतात. पण बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे या जीवनसत्त्वांची कमतरता जाणवण्याचं प्रमाण वाढलंय.
प्रत्येक व्हिटॅमिनचं कार्य वेगवेगळं आहे. त्यातील जीवनसत्व अ म्हणजेच व्हिटॅमिन ए आपल्या शरीरातल्या महत्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. दृष्टी, त्वचा, हाडं, यासाठी हे जीवनसत्व गरजेचं आहे. दूध, अंडी, गाजर यामधून पुरेसं व्हिटॅमिन ए मिळू शकतं. 'व्हिटॅमिन ए' शरीराला कशासाठी आवश्यक आहे समजून घेऊया.
1. दृष्टीत सुधार
व्हिटॅमिन ए चं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं. हे डोळयातील पडदामध्ये रेटिनल प्रोटीन तयार करण्यास मदत करते, जे दृष्टीसाठी आवश्यक आहे. हे विशेषतः रात्री पाहण्यास मदत करतं. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
2. त्वचेचं आरोग्य
व्हिटॅमिन ए त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे पेशींचं पुनरुत्पादन करण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा निरोगी, गुळगुळीत राहते. तसंच सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए च्या नियमित सेवनानं त्वचेची चमक देखील वाढू शकते.
advertisement
3. रोगप्रतिकारशक्ती
आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात व्हिटॅमिन ए ची मोठी भूमिका आहे. यामुळे शरीर संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी तयार होतं. याशिवाय श्वसनसंस्थेचे रक्षण आणि शरीराला श्वसनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाचं आहे.
4. हाडांचं आरोग्य
व्हिटॅमिन ए मुळे हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत होते. हाडं निरोगी ठेवण्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. याशिवाय, व्हिटॅमिन ए कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या घटकांचं शोषण वाढवतं, जे हाडांच्या निर्मितीस मदत करतात.
advertisement
5. प्रजनन
प्रजनन संस्थेच्या आरोग्यासाठीही व्हिटॅमिन ए देखील महत्त्वाचं आहे. हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते आणि गर्भधारणेच्या प्रक्रियेत देखील उपयुक्त ठरू शकते.
'व्हिटॅमिन ए' साठी हे पदार्थ खा
advertisement
गाजर: गाजरात भरपूर बीटा कॅरोटीन असतं, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रुपांतरित होतं.
मासे: ट्राऊट आणि सॅल्मनसारखे मासे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहेत.
रताळे: रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन देखील भरपूर असतं, ज्यामुळे व्हिटॅमिन एची पातळी वाढते.
भोपळा: भोपळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
दूध आणि चीज: दूध आणि चीज 'व्हिटॅमिन ए' चे आणि प्रथिनांचे देखील चांगले स्रोत आहेत.
advertisement
पालक: पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या हे व्हिटॅमिन ए चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत.
अंडी: अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए तसंच इतर पोषक घटक असतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin A : 'व्हिटॅमिन ए' साठी हे पदार्थ नक्की खा, दूध, डोळे, त्वचा, हाडांसाठी गरजेचं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement