Digestion : ओवा - बडिशेपेचं पाणी प्या, पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपण केलेल्या आहाराचं योग्य पचन होणं हे आपल्या तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे. पचन व्यवस्थित होण्यासाठी, पोट स्वच्छ राहण्यासाठी ओवा - बडिशेपेचं पाणी पिणं फायदेशीर ठरु शकेल.
मुंबई : आपण केलेल्या आहाराचं योग्य पचन होणं हे आपल्या तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे. पचन व्यवस्थित होण्यासाठी, पोट स्वच्छ राहण्यासाठी ओवा - बडिशेपेचं पाणी पिणं फायदेशीर ठरु शकेल.
ओव्यामध्ये आढळणारे घटक पचनक्रिया सक्रिय करण्यासाठी आवश्यक आहेत. ज्यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ओवा आणि बडीशेप घातलेलं पाणी ही दोन नैसर्गिक औषधं आहेत. हे दोन्ही जिन्नस भारतीय स्वयंपाकघरात प्राचीन काळापासून वापरले जात आहेत. या दोन्ही गोष्टी पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात.
advertisement
बडीशेपेमध्ये उपस्थित बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म पोटात जिवाणू संसर्ग टाळण्यासाठी मदत करतो. ओव्यामध्ये अनेक प्रकारचे पचनासाठी पूरक घटक आढळतात, जे पचन प्रक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्याही कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनानं भूक वाढते आणि ते पावडर स्वरूपात किंवा पाण्यात उकळूनही वापरता येतं.
advertisement
बडीशेपेमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात. बडीशेप ही पोटाच्या आरोग्यासाठी वरदान मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, यामुळे पचनसंस्था मजबूत होते. बडीशेपेचे पाणी प्यायल्यानं पोट फुगणं आणि दुखणं यापासून आराम मिळतो. याशिवाय बडीशेपेचे नियमित सेवन केल्यानं श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि तोंडाचं आरोग्यही सुधारतं. हे मिश्रण पोट आणि यकृताचं अनेक आजार कमी करण्यास मदत करते. शरीराला डिटॉक्सिफाय करणं आणि चयापचय वाढवण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो. सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे.
advertisement
खाण्याच्या अनियमित सवयी, ताणतणावामुळे समस्या वाढतात. अशा वेळी, या मिश्रणानं गॅस्ट्रिक समस्या दूर होऊ शकतात. ओव्यामुळे पचन प्रक्रिया मजबूत होते. योग्य पचनसंस्थेमुळे आम्लपित्त, पोटदुखी आणि पेटके यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.
हे मिश्रण बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा - बडिशेप टाका आणि रात्रभर भिजू द्या. सकाळी ते गाळून रिकाम्या पोटी प्या. नियमित वापरानं तुम्हाला गॅस्ट्रिक समस्यांपासून आराम मिळू लागेल. या व्यतिरिक्त, हा उपाय आतड्यांच्या हालचालीमध्ये देखील मदत करतो, ज्यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात आणि तुम्हाला ताजंतवानं वाटतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 16, 2025 2:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Digestion : ओवा - बडिशेपेचं पाणी प्या, पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय