रांची : आजकाल आपलं आयुष्य एवढं धावपळीचं झालंय की, आजारांजवळही आपण वेळेआधीच जाऊन पोहोचतो. डॉक्टर सांगतात, सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर कितीही कामाचा व्याप असूद्या, वेळच्या वेळी जेवण आणि 8 तास झोप व्हायलाच हवी, भरपूर पाणी प्यायलाच हवं. एकूणच निरोगी आयुष्यासाठी हेल्थी लाइफस्टाइल जगायला हवी.
आजकाल आधी करियर मग लग्न, ही विचारसरणी बऱ्यापैकी रुजली आहे. अनेक तरुण-तरुणी करियरनंतर लग्न करतात. परिणामी बाळासाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्याही वाढली आहे. उशिरा लग्न केल्यामुळे मूल होण्यास अडचणी सहन कराव्या लागतात. तर, काहींना लवकर लग्न होऊनही बाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात.
advertisement
हेही वाचा : 25, 30 की 35? आई होण्याचं योग्य वय कोणतं? डॉक्टरांनी सांगितलं चाळीशीत काय करावं
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे सांगतात, आजकाल वंधत्त्वाची समस्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. याचं मुख्य कारण आहे, प्रचंड ताण आणि जंक फूडचं सेवन. म्हणूनच आपली लाइफस्टाइल हेल्थी करणं आवश्यक आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी जंक फूडपासून जेवढं राहता येईल तेवढं लांब राहावं. महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा खायला काही हरकत नाही. त्याचबरोबर जास्त ताण घेऊ नये. त्यामुळे हॉर्मोन्स असंतुलीत होतात आणि गर्भधारणेत अडचणी येतात. म्हणूनच ताणाचं योग्य व्यवस्थापन व्हायला हवं, ज्यासाठी वेळच्या वेळी मेडिटेशन आणि व्यायाम करावा. दिवसभरात किमान अर्धा तास चालावं. दिवसभरात कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावं.
शरीर स्वच्छ ठेवा!
शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असायला हवं. शरीर योग्य आहार घेऊन आणि मन मेडिटेशन करून स्वच्छ राहू शकतं. जास्तीत जास्त प्रोटिनयुक्त पदार्थ खा. मोड आलेले कडधान्य खा, सुकामेवा खा. ही लाइफस्टाइल किमान 4 महिने फॉलो केल्यास गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी औषधांशिवाय 90 टक्के कमी होतील, असं डॉक्टरांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.