जिमला न जाता घरच्या घरी वर्कआउट करून सुद्धा आपण वजनावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी दिवसभरात कोणत्याही वेळी स्वत:साठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही घरच्या घरी अर्धा तास वर्कआउट केला तरी पण वजनावर नियंत्रण ठेवता येतं.
Health Tips In Marathi: झोप पूर्ण नसल्यास चिडचिड अन् थकवा, मग झोपेचे योग्य गुपित काय? Video
advertisement
काही लोक दिवसभर जॉब करतात. त्यानंतर घरी आल्यावर पाहिजे तशी एनर्जी राहत नाही. त्यामुळे जिमला जायचे टाळाटाळ करतात. पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. काही लोक वर्क फ्रॉम होम करतात. तेव्हा आरोग्यासाठी आपण घरच्या घरी काहीही पैसे खर्च न करता होम वर्कआउट करू शकतो. यामुळे जिमचा खर्चही वाजतो आणि आरोग्यही चांगले राहते. तसेच आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार हा वर्कआउट करता येते.
आरोग्यासाठी फायदेशीर
होम वर्कआउट करताना कशापासून सुरुवात करावी? हा प्रश्न अनेकांन असतो. तर सुरुवातीला तुम्ही बेसिक योगा करू शकता त्यात सूर्यनमस्कार तसेच इतर आसने देखील करता येतील. पुढे हळूहळू त्यात वाढ करत तुम्ही इतर व्यायाम प्रकार करू शकता. तुम्ही दिवसभरातून 20 ते 30 मिनिटे व्यायाम केला तरी, तो तुमच्या शरीरावर असणारा ताण कमी करण्यास मदत करतो. हार्ट सर्क्युलेशन व्यवस्थित होते. हृदय निरोगी राहते आणि पैशाची बचत देखील होते.
होम वर्कआउट कधीपासून सुरू करावा?
होम वर्कआउट सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं मोटिवेशन. कारण जर आपण जिमला गेलो तर एका कोणत्यातरी दिवसापासून त्याची सुरुवात करतो. पण होम वर्कआउट करताना अनेकदा अडचण येते. आज करू नाहीतर उद्या करू असं अनेकांचं होतं. त्यामुळे होम वर्कआउट करताना मोटिवेशनची गरज असते, असे भालेराव सांगतात.