कोणत्या चुका टाळाव्यात?
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या नादात त्वचा आणखी ड्राय करतो. आपण करत असलेल्या चुकांपैकी एक म्हणजे वारंवार चेहरा धुणे. तसेच वारंवार फेसवॉश वापरणे. हिवाळ्यात आपली त्वचा आधीच ड्राय झालेली असते. त्यात आणखी वारंवार चेहरा धुणे, फेसवॉश वापरणे या चुका जर आपण केल्यात तर आपली त्वचा आणखी कोरडी होते. त्यानंतर त्वचेला खाज येणे, बारीक पुरळ येणे या समस्या उद्भवतात. म्हणून हिवाळ्यात फेसवॉश फक्त एकदाच वापरा. चेहरा देखील वारंवार धुवू नका. अगदी ऑईली स्कीन असेल तरीही चेहरा एकदाच धुणे पुरेसे आहे, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
Pune : कचऱ्याचे ढीग आता पूर्णपणे गायब होणार, पुण्यात राबवण्यात येणार ही नवीन कचरा संकलन पद्धत
घरगुती उपाय ठरू शकतात हानिकारक
पुढे त्या सांगतात की, दुसरी चूक आपण करतो ती म्हणजे घरगुती उपाय करणे. एखाद्याने सांगितलं असेल किंवा सोशल मीडियावर बघितलेलं असेल. आपल्याला काही त्रास असल्यास आपण तो उपाय करतो. पण, ही सर्वात मोठी चूक आहे. कारण प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. आपल्या त्वचेला नेमकं काय सूट होतं, काय नाही, हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. चेहरा लाल होणे, काळवटणे, लाल चट्टे पडणे अशा समस्या उद्भवतात, अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपला त्वचा प्रकार न घेता सरळ चेहऱ्यावर काहीही लावणे चुकीचे आहे. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. त्वचा विकार असल्यास किंवा कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपचार करू नये, अशी माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.