केसांसाठी आवळ्याचे फायदे
आवळा केस आणि त्वचेसाठी सुपरफूड आहे. आवळ्याचा उपयोग केवळ फळ म्हणून किंवा लोणचं, भाजीसाठीही होतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. केसांच्या योग्य आणि चांगल्या वाढीसाठी हे जीवनसत्त्व उपयुक्त ठरू शकतं.
Eye Exercises : थकलेल्या डोळ्यांना द्या आराम, डोळे निरोगी ठेवण्यासाठी करा हे व्यायाम
आवळ्याचा वापर कशाप्रकारे करावा
advertisement
आवळ्याचा योग्य वापर केला तर केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लांब आणि दाट केसांसाठी आवळा ज्यूस उपयुक्त ठरेल. यासाठी दररोज फक्त एक किंवा दोन आवळे पुरेसे आहेत. आवळे बारीक चिरून घ्या. त्यात कढीपत्ता आणि थोडं आलं घाला. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक करा. आणि, रस तयार करा. हा रस रोज प्यायल्यानं केसांच्या वाढीवर परिणाम होतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिमूटभर मीठही मिक्स करू शकता.
Tanning : टॅनिंग कमी करण्यासाठी घरी बनवता येईल स्क्रब, कोरडी त्वचा होईल मुलायम
तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा जर तुम्हाला दररोज हा रस बनवणं शक्य होणार नसेल तर तुम्ही ते साठवूनही ठेवू शकता. तुम्ही तयार केलेला रस साठवण्यासाठी, बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. तुम्हाला ज्यूस प्यायचा असेल तेव्हा कोमट पाण्यात हे आवळा बर्फाचे तुकडे टाका. रस वितळताच प्या.
केसांसोबतच त्वचेसाठीही आवळा फायदेशीर
केस गळण्यासोबतच त्वचेवर मुरुमांचा त्रास होत असेल तर आवळ्याचा रस उपयुक्त आहे. आवळ्याचा रस नियमितपणे प्यायल्यानं त्वचेवरील डाग कमी होतात आणि त्वचा चमकदारही होईल.
आवळा ज्यूस पिण्याचे आरोग्य फायदे
आवळा ज्यूस प्यायल्यानं तुमच्या त्वचेला आणि केसांनाच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यालाही फायदा होईल. आवळा ज्यूसच्या मदतीनं शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. हाडं मजबूत होतात आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.
