या नोकरदार लोकांच्या बाबतीत हे घडतं
ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका नवीन अभ्यासात दावा केला आहे की, नोकरी सुरू केल्यानंतर तरुणांची शारीरिक क्रियाशीलता लक्षणीयरित्या कमी होते आणि झोपही कमी होते. यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या सुरू होतात. संशोधनानुसार, जेव्हा तरुण व्यावसायिक जीवन सुरू करतात, तेव्हा सुरुवातीला शारीरिक क्रियाशीलता वाढते, पण कालांतराने ती लक्षणीयरित्या कमी होते. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. हे सर्व लोकांच्या बाबतीत लागू होत नाही, परंतु जे लोक व्यवस्थापन किंवा व्यावसायिक पदांवर काम करतात त्यांच्या बाबतीत असं घडतं.
advertisement
सक्रिय राहणं अत्यंत महत्त्वाचं
शास्त्रज्ञांच्या मते, जे तरुण जास्त शारीरिक क्रियाशील असतात. ते गाडी चालवणे, केशभूषा करणे, साफसफाई करणे, वेटिंग किंवा तांत्रिक नोकऱ्यांसारखी कामं करतात. तर व्यवस्थापन आणि व्यावसायिक लोक शारीरिक क्रियाशीलतेत खूप कमी गुंतलेले असतात. केंब्रिज विद्यापीठातील मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या तज्ज्ञ एलेना ऑक्सनहॅम म्हणाल्या की, जर आपल्याला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल, तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे.
नोकरीमुळे झोपेवर परिणाम झाला
घरातून काम करणाऱ्या लोकांना तज्ज्ञांनी त्यांच्या दिनचर्येत शारीरिक क्रियाशीलतेचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. कामाआधी, नंतर किंवा जेवणानंतर चालण्यासाठी नक्की जा. या अभ्यासात 16-30 वयोगटातील 3000 हून अधिक लोकांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं होतं. या सर्वांनी 2015 ते 2023 दरम्यान पहिल्यांदा नोकरी सुरू केली होती. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यूट्रिशन अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये प्रकाशित झालेल्या निकालांनुसार, नोकरी सुरू केल्यानंतर सरासरी 28 मिनिटे शारीरिक क्रियाशीलता वाढली. मात्र, नंतर ती कमी झाली. तसेच, झोपही सुमारे 10 मिनिटांनी कमी झाली.
हे ही वाचा : खरंच हिरवी मिरची खाल्ल्याने शुगर कमी होते? संशोधनात सिद्ध झाली धक्कादायक बाब, त्वरित समजून घ्या
हे ही वाचा : Smartphone in toilet: टॉयलेटमध्ये घेऊन जाता मोबाईल ? आत्ताच सुधारा ‘ही’ वाईट सवय, अन्यथा होतील भयंकर आजार